
Nag Panchami 2024 : प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नाग पंचमी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी 9 ऑगस्टला आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. अशातच नागपंचमीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष दूर केला जाऊ शकतो. तर जाणून घेऊया कालसर्प दोष म्हणजे नक्की काय आणि यापासून दूर राहण्यासाठी नागपंचमीला कोणते उपाय करू शकता याबद्दल अधिक...
कालसर्प दोष म्हणजे काय?
उज्जैनमधल ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, ज्योतिषशास्रामध्ये राहुला सापाचे मुख आणि केतूला शेपूट मानले आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या कुंडलीत राहु आणि केतूमध्ये अन्य सर्व 7 ग्रह आल्यास या स्थितीला कालसर्प दोष असे म्हटले जाते. कालसर्प दोष झाल्यास व्यक्तीला आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषशास्रात, 12 प्रकारचे कालसर्प दोषांबद्दल सांगण्यात आले आहे. यापासून दूर राहण्यासाठी जाणून घेऊया उपाय...
नागदेवतेची पूजा करा
नागपंचमीच्या दिवशी घराजवळील एखाद्या नाग मंदिरात जाऊन नागदेवतेची पूजा करावी. यावेळी गाईच्या दूधाने अभिषेक करण्यासह फूल अर्पण करावीत. या उपायाने नागदेवतेची कृपा तुमच्यावर राहिल आणि कालसर्प दोषचा प्रभावही कमी होईल.
नवनाग स्तोत्राचे पठण करा
नाग देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी नवनाग स्तोत्र आहे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करुन पांढरे वस्र परिधान करुन नवनाग स्तोत्राचे पठण करू शकता.
चांदीचे नाग-नागिण नदीत सोडा
नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून तयार करण्यात आलेले नाग-नागिण एखाद्या नदीच्या प्रवाहात सोडा. तत्पूर्वी विधीवत पूजाही करा.
कालसर्प यंत्राची पूजा करा
नागपंचमीच्या दिवशी कालसर्प यंत्राची स्थापना करून त्याची पूजा करा. घराबाहेर पडतानाही कालसर्प यंत्राला नमस्कार करा. यामुळे आयुष्यातील नकारात्मकता दूर होण्यास अडकलेली कामेही पूर्ण होतील.
आणखी वाचा :
भारतातील रहस्यमयी नाग मंदिर, महाभाराच्या काळाशी संबंधित आहे इतिहास
श्रावणात मुंबईतील शंकरांच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या