चुकीने ऑनलाइन प्रोडक्ट घरी आलेय? कंपनी रिफंड देत नसल्यास करा हे काम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्या उत्तर प्रदेशातील एका उपजिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय सामान मागवले असता त्याएवजी नॅपकिनचा बॉक्स मिळाला.
ऑनलाइन प्रोडक्ट ऑर्डर केल्यानंतर चुकीचे असल्यास घाबरू नका. तुम्ही ते जेथून ऑर्डर केलेय तेथे परत पाठवून तुमच्या पैशांचे रिफंड मिळवू शकता.
प्रत्येक ई-कॉमर्स कंपन्या चुकीचे प्रोडक्ट ग्राहकाला गेल्यानंतर रिफंड देते. पण प्रत्येक ई-कॉमर्स कंपनीची रिफंड देण्याचे नियम आणि वेगवेगळ्या असतात.
कंपनीकडून तुम्हाला चुकीचे प्रोडक्ट डिलिव्हर झाल्यास व कंपनी रिफंडही देत नसल्यास कंज्युमर प्रोटेक्शन अॅक्ट 2019 ची मदत घेऊ शकता. याशिवाय कंपनीच्या विरोधात तक्रारही दाखल करू शकता.
कंपनी प्रोडक्टचे रिफंड देत नसल्यास तुम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस पाठवू शकता. याशिवाय 30 दिवसात उत्तर न आल्यास तक्रारही दाखल करू शकता.
रिफंड मिळवण्यासाठी कंज्युमर डिस्प्युट्स रिड्रेसर फोरम किंवा कमीशनमध्ये तक्रार करू शकता.
कंपनी रिफंड देत नसल्यास डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेअर्सच्या इंटिग्रेटेड ग्रीवांस रिड्रेस मॅकेनिज्म पोर्टलवरही ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.