मुंबई - ऑगस्ट २०२५ च्या शेवटी बुध ग्रहाचं राशीपरिवर्तन होऊन राजयोग तयार होणार आहे. बुध हा नवग्रहांपैकी एक असून ज्या ग्रहासोबत असतो त्याची शक्ती वाढवतो. ज्योतिषशास्त्रात त्याचं विशेष महत्त्व आहे.
प्रत्येक ग्रह ठराविक वेळेत राशी बदलतो. बुध हा देखील त्यापैकी एक आहे. हा ग्रह २३ दिवसांत राशी बदलतो. ३० ऑगस्टला बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल जिथे सूर्य आधीपासूनच आहे. सूर्य आणि बुध एकत्र येऊन बुधादित्य राजयोग तयार होईल. याचा शुभ प्रभाव ४ राशींवर जास्त असेल.
25
वृषभ राशीला धनलाभ
वृषभ राशीच्या लोकांना बुधाच्या राशी बदलामुळे धनलाभाचे अनेक योग येतील. अडकलेला पैसा मिळू शकतो. प्रेमसंबंधात यश मिळेल. व्यवसाय-नोकरीची स्थिती चांगली राहील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांनाही मेहनतीचं फळ मिळेल.
35
सिंह राशीला भाग्याची साथ
सिंह राशीतच बुधादित्य राजयोग तयार होईल, त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. नोकरदारांना अतिरिक्त उत्पन्नाचे योग येऊ शकतात. वादविवादांपासून सुटका मिळेल. संततीचं आरोग्य चांगलं राहील. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीतील मेहनतीचं फळ मिळेल, ज्यामुळे त्यांची बढती होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून सुटका मिळेल. प्रेमसंबंधातील वाद संपतील. मामाकडून आर्थिक मदत मिळेल.
55
मीन राशीचं बँक बॅलन्स वाढेल
मीन राशीच्या लोकांच्या बँक बॅलन्समध्ये अचानक वाढ होऊ शकते. शेअर बाजारातून अनपेक्षित फायदा होण्याचे योग आहेत. मंदीत चाललेला व्यवसाय अचानक वेगवान होऊ शकतो. पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा फायदा मिळू शकतो.