मुंबई - भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये या अमावस्येचे महत्त्व सांगितले आहे. अमावस्येचे देवता पितर असल्याने, या दिवशी पितरांच्या शांतीसाठी विशेष उपाय केले जातात.
धर्मग्रंथांनुसार, कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी अमावस्या असते. एका वर्षात १२ अमावस्या येतात, त्यात भाद्रपद महिन्यातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात तिला पिठोरी अमावस्या म्हणतात. २०२५ मध्ये कधी आहे पिठोरी अमावस्या?
25
२०२५ मध्ये कधी आहे पिठोरी अमावस्या?
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील अमावस्या २२ ऑगस्ट, शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि २३ ऑगस्ट, शनिवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील. २२ ऑगस्टला अमावस्या असल्याने, याच दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाईल.
35
पिठोरी अमावस्या २०२५ शुभ मुहूर्त
पिठोरी अमावस्येचा विशेष शुभ मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपासून रात्री ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी १२:२९ ते २:०४, दुपारी १२:०४ ते १२:५५ (अभिजीत मुहूर्त), संध्याकाळी ५:१४ ते ६:४९.
पिठोरी अमावस्येला महिला ६४ योगिनींच्या पिठाच्या प्रतिमा बनवून त्यांची पूजा करतात. त्यामुळे त्यांना निरोगी, सुंदर आणि योग्य संतान प्राप्त होते. पुरुष पितरांच्या शांतीसाठी पिंडदान, तर्पण करतात.
55
पिठोरी अमावस्येचे उपाय
१. पवित्र नदीत स्नान करून गरजूंना अन्नदान करा. २. पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध व तर्पण करा. ३. ब्राह्मणाला जेवण घाला आणि दान द्या. ४. गायींना हिरवा चारा खाऊ घाला. ५. पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावा.