मेकअप करता येत नाही? फॉलो करा या स्टेप्स

Published : Jun 18, 2025, 03:15 PM IST

अनेक जणींना मेकअप आवडतो, पण तो योग्य पद्धतीने करायला माहिती नसते. सुरुवातीला मेकअप करताना चुका होतातच, पण काही सोप्या स्टेप्स फॉलो करून सुंदर आणि नैसर्गिक मेकअप करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

PREV
17
चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चराईज करा

मेकअप करण्यापूर्वी चेहरा चांगला धुवून घ्या आणि टॉवेलने हलक्याच हाताने पुसा. त्यानंतर आपल्या त्वचेनुसार (कोरडी/तेलकट/मिश्र) योग्य असा मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझरमुळे मेकअप सुरळीत बसतो आणि चेहर्यावर चकाकी राहते.

27
प्रायमर वापरा

प्रायमर हा मेकअपचा पहिला टप्पा आहे. तो त्वचेला मऊ करतो, भेगा/छिद्रे भरून टाकतो आणि मेकअपला दीर्घकाळ टिकवतो. प्रायमर संपूर्ण चेहऱ्यावर आणि विशेषतः नाक, कपाळ, गालांवर लावा.

37
फाउंडेशन आणि कन्सीलर

आपल्या त्वचेच्या रंगाशी मिळता-जुळता फाउंडेशन निवडा. स्पंज, ब्रश किंवा बोटांनी ते चेहऱ्यावर नीटसर पसरवा. डोळ्याखालील काळी वर्तुळे, डाग किंवा मुरुम झाकण्यासाठी कन्सीलर वापरा. कन्सीलर ब्लेंड करताना सौम्य हाताने करा.

47
फेस पावडर किंवा कॉम्पॅक्ट लावा

फाउंडेशन आणि कन्सीलर सेट होण्यासाठी हलकी फेस पावडर लावावी. यामुळे चेहर्याचा ऑयलीपणा कमी होतो आणि मेकअप दीर्घकाळ टिकतो.

57
आयब्रो आणि डोळ्यांचा मेकअप

डोळ्यांचा मेकअप चेहऱ्याला उठाव देतो. आयब्रो पेंसिलच्या मदतीने भुवया नीट आकारात आणा. हलका ब्राऊन किंवा न्यूड शेड आयशॅडो वापरून डोळ्यांवर हायलाईट करा. त्यानंतर आयलाइनर लावा आणि शेवटी मस्कारा वापरून डोळ्यांना आकर्षक लूक द्या.

67
ब्लश आणि हायलाईटर

गालांवर सौम्य रंगाचा ब्लश वापरा.यामुळे फ्रेश आणि हेल्दी लूक येतो. नाकाच्या हाडावर, कपाळावर आणि हनुवटीवर थोडासा हायलाईटर लावल्यास चेहर्याला एक नैसर्गिक चमक मिळते.

77
लिपस्टिक आणि सेटिंग स्प्रे

शेवटी आपल्या ड्रेस आणि स्किनटोनला साजेशी लिपस्टिक लावा. न्यूड, पिंक, रेड – तुम्हाला हवे तसे. लिपलाइनर वापरल्यास लिपस्टिक नीट बसते. सगळा मेकअप सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरा.

Read more Photos on

Recommended Stories