Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या सणात तिळ आणि गुळ यांना खास महत्त्व आहे. पारंपरिक तिळगुळ लाडूपासून ते खीर आणि चिकीपर्यंत या ५ झटपट रेसिपी करून तुम्ही सणाचा आनंद गोड आणि आरोग्यदायी पद्धतीने साजरा करू शकता.
मकर संक्रांत हा सण आनंद, आरोग्य आणि गोडव्याचा संदेश देणारा आहे. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” या म्हणीप्रमाणे तिळ आणि गुळ यांना या सणात विशेष महत्त्व आहे. पौष्टिक आणि उष्ण गुणधर्म असलेले तिळ आणि गुळ थंडीच्या दिवसांत शरीराला उर्जा देतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने घरात झटपट, चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ करायचे असतील, तर या ५ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा.
27
मकर संक्रांतीचे धार्मिक व आरोग्य महत्त्व
मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे हा सण नवीन ऋतूची सुरुवात मानला जातो. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व असून तिळ, गूळ, वस्त्र आणि धान्यदान पुण्यकारक मानले जाते. तिळ आणि गुळ उष्ण असल्याने शरीरातील थंडी कमी होते, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
37
तिळगुळ
पारंपरिक तिळगुळ लाडू भाजलेले तिळ, गुळ आणि थोडं तूप वापरून बनवलेले तिळगुळ लाडू ही सर्वात सोपी आणि लोकप्रिय रेसिपी आहे. फक्त १०–१५ मिनिटांत तयार होणारे हे लाडू चविष्ट आणि पौष्टिक असतात.
थोड्याच वेळात तयार होणारी तिळगुळाची चिकी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती आहे. तिळ भाजून त्यात गुळाची पाकळी मिसळून पसरवली की स्वादिष्ट चिकी तयार होते.
57
तिळगुळाची पोळी (पुरणपोळी स्टाइल)
गव्हाच्या पीठात तिळ-गुळाचे सारण भरून केलेली तिळगुळाची पोळी मकर संक्रांतीला खास केली जाते. ही पोळी तुपासोबत खाल्ल्यास तिची चव आणखी वाढते.
67
तिळगुळाची बर्फी
यंदाच्या मकर संक्रांतीला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तिळगुळाची बर्फी तयार करू शकता. याची रेसिपी तु्म्हाला सोशल मीडियावर पाहू शकता.
77
तिळगुळ चॉकलेट रेसिपी
तिळगुळ चॉकलेट रेसिपी मकर संक्रांतीला तयार करू शकता. यासाठी मावा, तिळ, गूळ आणि ड्राय फ्रुट्स वापरुन बनवू शकता. ही रेसिपी माव्याच्या बर्फीसारखीच आहे.