Parenthood : मुलं चुकल्यावर ओरडणं, मारणं हा योग्य मार्ग आहे का? या पद्धतींमुळे मुलांच्या वागण्यात खरंच बदल होतो का? की त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितलेल्या या काही महत्त्वाच्या गोष्टी पालकांनी नक्कीच जाणून घ्यायला हव्यात.
प्रत्येक पालकांना वाटतं की, आपली मुलं चांगली वाढावीत. पण मुलं चुकल्यावर अनेकजण लगेच रागवतात, ओरडतात किंवा मारतात. यामुळे मुलांच्या मनात पालकांबद्दलचा आदर कमी होतो आणि द्वेष वाढतो.
25
ओरडण्याचा मुलांवर होणारा परिणाम
प्रत्येक लहान गोष्टीसाठी मुलांवर ओरडू नये. चूक केल्यास प्रेमाने समजावून सांगा. सतत ओरडल्यामुळे मुलं घाबरतात आणि आपल्या समस्या सांगणं बंद करतात. यामुळे पालकांशी त्यांचं अंतर वाढतं.
35
जास्त बंधनं घातल्यास काय होतं?
आजच्या मुलांना टीव्ही, फोनची सवय आहे. जास्त बंधनं घातल्यास मुलं बंडखोर होतात. चूक केल्यावर मारल्याने त्यांच्या मनात भीतीबरोबरच राग आणि चिंता वाढते, असं तज्ज्ञ सांगतात.
'तू बिनकामाचा आहेस' असे शब्द मुलांच्या मनावर जखमा करतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. कठोर वागण्यामुळे मुलांमध्ये मानसिक समस्या वाढतात, असं संशोधनातून समोर आलं आहे.
55
मग मुलांना कसं बदलायचं?
मुलांना शिक्षेने नाही, तर समजुतीने बदलायला हवं. चूक केली तरी प्रेम कमी होणार नाही, हे त्यांना सांगा. चुकीचे परिणाम समजावून सांगा. संगोपनात शिक्षेपेक्षा संयम महत्त्वाचा आहे.