प्रत्येक वर्षी मकर संक्रातच्या तारखेसंदर्भात संभ्रम निर्माण होतो.अशातच यंदा मकर संक्रात 14 की 15 जानेवारीला साजरी केली जाणार याची योग्य तारीख आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया...
Makar Sankranti 2025 Date : मकर संक्रात हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. मकर संक्रातच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्यासह गरजूंना दान करण्याचे विशेष महत्व आहे. मकर संक्रातचा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून मकर संक्रातच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. अशातच यंदा मकर संक्रात 14 की 15 जानेवारीला असणार याबद्दल उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. नलिन शर्मा काय म्हणतात हे जाणून घेऊया...
ज्योतिषाचार्य पं, नलिन शर्मा यांच्यानुसार, सूर्य प्रत्येक 30 दिवसानंतर एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यालाच संक्रात असे म्हटले जाते. सूर्य ज्यावेळी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रात साजरी केली जाते. प्रत्येक सूर्य 14 किंवा 15 जानेवारीला मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यामुळे अलीकडल्या काळात दोन्ही तारखांना मकर संक्रात साजरी केली जाते.
ज्योतिषाचार्य शर्मा यांच्यानुसार, वर्ष 2025 मध्ये मकर संक्रात 14 जानेवारी, मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी भगवान सूर्य मकर संक्रातवेळी वेगवेगळ्या वाहनांवरुन अश्वारुढ होऊन येतात. यंदा भगवान सूर्य घोड्यावर स्वार होऊन येणार आहेत. याचा अर्थ असा होतो की, यंदाच्या वर्षात नागरिकांना अधिक मेहनत करावी लागेल पण त्यासोबत यशही मिळणार आहे.
मकर संक्रातचा शुभ मुहूर्त सकाळी 9 वाजून 03 मिनिटांपासून ते 10 वाजून 48 मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय सामान्य शुभ मुहूर्त याच दिवशी सकाळी 09 वाजून 03 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. धर्म ग्रंथांनुसार, मकर संक्रातवेळी शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करणे आणि गरजूंना दान केल्याने दुप्पट फळ मिळते.
आणखी वाचा :