लग्नाच्या दिवशी बैचेन आणि टेन्शन आलेयं? फॉलो करा या टिप्स

Published : Dec 14, 2024, 12:18 PM IST
wedding day anxiety tips

सार

लग्नाच्या काही दिवसांआधी मुलींमध्ये टेन्शन वाढल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे लग्नाच्या दिवशीही अत्याधिक बैचन झाल्यासारखे वाटत राहते. यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे जाणून घेणार आहोत.

Tips for wedding day anxiety : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार मोठा क्षण असतो. पण लग्नाच्या दिवशी भीती, बैचेन वाटणे किंवा एंग्जायटीची समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. पण लग्नाच्या दिवशी मनात वेगवेगळे विचार सुरू असण्यासह सातत्याने टेन्शन येत असल्यास काय करावे याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेणार आहोत.

दिवसाची आरामात सुरुवात करा

लग्नाच्या दिवसाची सुरुवात भीती आणि टेन्शन वाढल्याने होऊ शकते. यामुळे सकाळी उठल्यानंतर डोक शांत राहिल यासाठी प्रयत्न करा. यावेळी थोडावेळ मेडिटेशन करा, स्वत:बद्दल सकारात्मक विचार करा.

जबाबदारी वाटून घ्या

लग्नाच्या दिवशी नववधूने स्वत:वर अत्याधिक जबाबदाऱ्या घेण्याएवजी त्या अन्य नातेवाईकांमध्ये वाटून द्याव्यात. यावेळी डोक शांत राहण्यासाठी आणि एंग्जायटीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी विश्वासू मित्रपरिवाराकडे काही कामे द्या. जेणेकरुन तुमची चिंता कमी होईल.

हेल्दी डाएट

भीतीच्या पोटी नववधूला थकवा किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. यामुळे शरिरातील ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी आणि शरिराच्या उर्जेसाठी हेल्दी डाएटचे सेवन करा. याशिवाय दिवसातून थोड्याथोड्या वेळाने काही तरी खा.

महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

पाणी, स्नॅक्स, टिश्यू किंवा अन्य महत्वाच्या गोष्टींसाठी एक लहान बॅग पॅक करा. यामध्ये तुमच्या महत्वाच्या वस्तू ठेवा. जेणेकरुन लग्नाच्या अखेरच्या घटकेला घाई होणार नाही.

खुलेपणाने बोला

लग्नाच्या दिवशी आपल्या मनात भीती किंवा बैचेन वाटत असल्यास एखाद्याशी खुलेपणाने बोला. जेणेकरुन मन शांत होईल.

आणखी वाचा : 

Intermittent Fasting करण्याआधी लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा...

थंडीत Hair Mask मुळे सर्दी-खोकला होतो? वापरा या वस्तू

PREV

Recommended Stories

iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!
Horoscope 7 December : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!