Lemon Coriander Soup Recipe in Marathi : घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे कोरिअन्डर सूप तयार करायचे असल्यास याची रेसिपी आज पाहणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया…
साहित्य :
1 चमचा लिंबाचा रस
1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
1 चमचा कॉर्न फ्लोअर
1/2 चमचा मीठ
1 वाटी गाजर
1 वाटी बारीक चिरलेली फरसबी
1 वाटी बारीक चिरलेला कोबी
अर्धा चमचा बारीक चिरलेले आलं
अर्धाचमचा बारीक चिरलेले लसूण
एक चमचा बटर किंवा तेल
अर्धा चमचा काळी मिरी पावडर
कृती
सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या
कॉर्न फ्लोअरमध्ये पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.
गॅसवर पॅनमध्ये तेल किंवा बटर घालून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर भाज्या घालून परतून घ्या. यामध्ये लिंबाचा रस आणि कोथिंबीरही मिक्स करा.
गॅसवर दुसऱ्या बाजूला एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर सूपच्या मिश्रणात मिक्स करुन घ्या.