
Laxmi Pooja 2024 Wishes in Marathi : कार्तिक महिन्यातील अमावस्येवेळी दिवाळीचा सण साजरा केला जातो. आज (1 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. यावेळी गणपतीची देखील पूजा केली जाते. धार्मिक कथेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचे आगमन झाल्याने लक्ष्मीपूजन केले जाते. अशातच यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या खास शुभेच्छा देत दिवाळीचा सण साजरा करा.
दिव्याचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज,
सूर्यकिरण, आनंदाचा वर्षाव,
चंदनाचा सुगंध, प्रियजनांचे प्रेम
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!
लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीची होईल कृपा एवढी,
सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचे काम
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आणखी वाचा :
Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी साठी नोट करा हे 4 शुभ मुहूर्त
Diwali: लक्ष्मीला कमळ का आवडते, त्याचे 10 गुण तुम्हाला माहीत आहेत का?