Lady finger benefits and side effects : भेंडी एक पौष्टिक भाजी असून काहीजणांसाठी विषसमान ठरू शकते. अॅलर्जी, पचनासंबंधित समस्या आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी भेंडीची भाजी खाणे टाळले पाहिजे.
Health Care Tips : भेंडीची भाजी सर्वसामान्यपणे हेल्दी भाजी मानली जाते. भेंडीच्या भाजीमध्ये सर्व पोषण तत्त्वे असतात. पचनासाठी हलकी अशी भेंडीची भाजी वजन कमी करणे ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. एवढेच नव्हे काही व्यक्तींसाठी भेंडीची भाजी विषासमान ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी चुकूनही भेंडीची भाजी खाऊ नये.
भेंडीमध्ये ओकरा लॅक्टिन नावाचे प्रोटीन असते. यामुळे काहींना भेंडीची भाजी खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते. याशिवाय भेंडीत फायबरचे प्रमाण अधिक असते. अशातच पोटात गॅस तयार होणे आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.
या व्यक्तींनी भेंडीची भाजी खाणे टाळावे
पचनासंबंधित समस्या असणाऱ्या व्यक्ती : तुम्हाला आधीच पचनासंबंधित समस्या असल्यास जसे की, बद्धकोष्ठता किंवा पोट फुगीची समस्या तर भेंडीची भाजी खाणे टाळावे.
मधुमेहाचे रुग्ण : भेंडी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी भेंडीची भाजी खाणे टाळावे. यासंबंधित डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.
गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला : गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनीही भेंडीची भाजी खाणे टाळावे असे सांगितले जाते.
आपण भेंडीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते म्हणून खातो. पण ज्या व्यक्तींना किडनी आणि कफची समस्या असल्यास त्यांनी चुकूनही भेंडीची भाजी खाऊ नये. भेंडीमध्ये असलेले कॅल्शिअम किडनी स्टोनची समस्या निर्माण करू शकतात. याशिवाय भेंडीतील चिकट पदार्थ कफची समस्या अधिक वाढवू शकतो.
भेंडी खाण्याचे फायदे
भेंडी खाल्ल्याने काहीजणांना आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. पण भेंडीचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी पोषण तत्त्वे असतात. यामुळे वजन कमी करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासह पचनास मदत करते.
आणखी वाचा :
Breakfast Recipe : नाश्तासाठी बनवा झटपट होणारा बटाट्याचा पराठा, पाहा रेसिपी
बदलत्या वातावरणामुळे अनाचक वाढलेत हे 3 आजार, वेळीच घ्या आरोग्याची काळजी