Published : Aug 05, 2026, 02:30 PM ISTUpdated : Aug 05, 2026, 02:31 PM IST
तुम्ही कॉफीप्रेमी आहात का? दिवसाची सुरुवात एक कप कॉफीशिवाय होत नाही? मग जगातील सर्वात महागडी कॉफी कशी असेल, याची उत्सुकता तुम्हालाही असेल. पण ती कशी बनते हे कळल्यावर कदाचित तुम्ही कायमची कॉफी सोडून द्याल!
चहाप्रेमींप्रमाणेच कॉफीचेही लाखो चाहते आहेत. अनेकांसाठी दिवसाची सुरुवात तरतरी आणणाऱ्या कडक कॉफीशिवाय होऊच शकत नाही. आपण बहुतेक जण घरी इन्स्टंट किंवा फिल्टर कॉफी पितो. बाजारात अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी जगातील सर्वात महागड्या कॉफीबद्दल ऐकलंय का? चला, जाणून घेऊया काय आहे तिची खासियत आणि तिची किंमत इतकी जास्त का आहे.
23
सर्वात महागडी कॉफी कोणती?
जगातील सर्वात महागड्या कॉफीचं नाव आहे 'कोपी लुवाक' (Kopi Luwak). ही कॉफी चवीसाठी नाही, तर तिच्या बनवण्याच्या विचित्र पद्धतीमुळे जास्त प्रसिद्ध आहे. जगभरातील कॉफी शौकिनांना आयुष्यात एकदा तरी ही कॉफी चाखायची इच्छा असते. इंडोनेशियामध्ये या कॉफीचं उत्पादन सर्वात आधी सुरू झालं. आजही सुमात्रा, जावा, बाली आणि सुलावेसी यांसारख्या ठिकाणी याची विक्री होते. आता खरी गंमत. 'एशियन पाम सिव्हेट' (Asian Palm Civet) नावाचा एक स्थानिक प्राणी पिकलेली कॉफी चेरी खातो. फळ पचल्यानंतर, तो प्राणी आपल्या विष्ठेतून कॉफीच्या बिया बाहेर टाकतो. त्यानंतर कामगार या बिया गोळा करतात, त्या स्वच्छ करतात, वाळवतात आणि भाजून त्याची पावडर बनवतात. ऐकायला विचित्र आणि किळसवाणं वाटत असलं, तरी हेच खरं आहे!
33
या मागील खास कारण
मग या कॉफीची चव इतकी खास का लागते? सिव्हेटच्या पचनसंस्थेत नैसर्गिक एन्झाइम्स असतात, जे कॉफीच्या बियांमधील प्रोटीन्समध्ये बदल घडवतात. या प्रक्रियेमुळे सामान्य कॉफीच्या तुलनेत या कॉफीची चव अविश्वसनीय लागते. ही कमी कडू आणि जास्त चवदार असते, ज्यात चॉकलेट, कॅरमेलचा गोडवा आणि एक मातीसारखा सुगंध जाणवतो. प्रत्येकासाठी हा अनुभव वेगळा असतो. या कॉफीचं उत्पादन खूप मर्यादित असल्यामुळे तिची किंमत जास्त आहे. प्राण्यांच्या विष्ठेतून बिया गोळा करणं आणि त्या स्वच्छ करण्याची प्रक्रिया खूप कठीण असते. अस्सल, नैसर्गिक कोपी लुवाक दुर्मिळ आहे, त्यामुळे एका किलोची किंमत शेकडो ते हजारो डॉलर्सपर्यंत असू शकते. मात्र, वाढत्या मागणीमुळे एक क्रूर प्रकार सुरू झाला आहे. लोक सिव्हेट प्राण्यांना पिंजऱ्यात डांबून त्यांना जबरदस्तीने कॉफी खाऊ घालतात, ज्यामुळे प्राणीप्रेमी संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे काही कॉफीप्रेमींना ही कॉफी चाखायची इच्छा असली, तरी ती कशी बनते हे ऐकून अनेकांना 'कॉफी' हा शब्दही पुन्हा ऐकावासा वाटत नाही!
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.