अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट तारखांना जन्मलेले लोक पैसा, यश आणि प्रसिद्धीच्या बाबतीत नैसर्गिकरित्या भाग्यवान असतात. सूर्य, गुरू, बुध आणि आध्यात्मिक ऊर्जेशी संबंधित जन्मतारखांमुळे कमी वेळेत संपत्ती आणि संधी मिळू शकते, असं मानलं जातं.
ज्योतिष आणि अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, तुमच्या जन्मतारखेचा तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. यावरून तुमचा स्वभाव, नशीब, आर्थिक स्थिती आणि भविष्य कळू शकतं, असं ते सांगतात. काही तारखांना जन्मलेले लोक तर नशिबाला जणू खेचून आणतात आणि खूप लवकर श्रीमंत होतात. चला, पाहूया या लकी लिस्टमध्ये कोणत्या तारखा आहेत.
25
1st, 10th, 19th, and 28th या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांवर सूर्याचा मोठा प्रभाव असतो. हे लोक जन्मतःच नेते असतात आणि त्यांना नेहमी नेतृत्व करायला आवडतं. समाजात त्यांना खूप मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळते. सरकारी नोकरी, व्यवसाय आणि राजकारणात त्यांना लवकर यश मिळण्याची शक्यता असते.
35
3rd, 12th, 21st, and 30th या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्यांवर गुरू ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक आपली बुद्धिमत्ता, आध्यात्मिक विचार आणि अचूक निर्णय क्षमतेच्या जोरावर पुढे जातात. ते केवळ आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करत नाहीत, तर समाजातही एक विशेष ओळख निर्माण करतात. पैशाच्या बाबतीत तर नशीब नेहमीच त्यांच्या बाजूने असतं.
5th, 14th, and 23rd या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती
महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेले लोक बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. त्यांची विचार करण्याची जलद पद्धत, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक समज त्यांना आयुष्यात लवकर यशस्वी होण्यास मदत करते. नवीन कल्पना आणि संधी मिळवण्यात ते नेहमीच पुढे असतात. सोशल मीडिया, व्यवसाय, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात ते अनेकदा उच्च पदांवर पोहोचतात.
55
7th, 16th, and 25th या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती
अंकशास्त्रानुसार, ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांना खूप भाग्यवान मानलं जातं. त्यांच्यामध्ये एक मजबूत आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ते आयुष्यात खूप लवकर मोठी उंची गाठतात. सुरुवातीला त्यांना काही अडचणी येऊ शकतात, पण नंतर त्यांच्याकडे मोठ्या संधी चालून येतात. तज्ज्ञांच्या मते, त्यांना परदेश प्रवास, चांगली नोकरी आणि अनपेक्षित आर्थिक लाभाची दाट शक्यता असते. सूचना: अंकशास्त्राची ही माहिती केवळ मनोरंजनासाठी आहे. याला व्यावसायिक सल्ला समजू नये. ही माहिती इतर विश्वसनीय वेबसाइट्सवरून घेतली आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.