Kitchen Tips : हिवाळ्यात भांडी घासण्यासाठी गरम पाण्याची गरज नाही, वापरा ही पद्धत

Published : Jan 06, 2026, 05:31 PM IST

Kitchen Tips : हिवाळ्यात पाणी एवढे लगेच थंड होते की, त्यात हात घालण्याची हिम्मत होत नाही. अशा वेळी भांडी धुण्याचा कंटाळाच येतो. पण गरम पाणी नसले तरी काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही आरामात भांडी धुवू शकता. जाणून घ्या माहिती -

PREV
16
हात सुन्न होतात

हिवाळ्यात थंडी वाढल्यामुळे आपली रोजची कामंही अधिक कठीण होतात. सकाळी लवकर उठण्यापासून ते भांडी घासण्यासाठी पाण्यात हात घालण्यापर्यंत सर्व काही त्रासदायक वाटतं. थंड पाण्यामुळे तुमचे हात सुन्न होऊ शकतात. यामुळे तुमची बोटंही आखडतात आणि काही मिनिटांतच जळजळ होऊ शकते.

26
सोपा आणि सोयीस्कर मार्ग

रोज घरकाम करणाऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न आणखी जटील होतो. खरंतर, प्रत्येक घरात गिझर बसवणे इतके सोपे नसते. त्यामुळे कोणताही मोठा खर्च न करता भांडी धुण्याचे सोपे आणि सोयीस्कर मार्ग जाणून घेणे खूप उपयुक्त ठरू शकते.

36
रबर किंवा सिलिकॉनचे हातमोजे

हिवाळ्यात भांडी धुण्यासाठी नळ चालू करताच थंड पाणी हाताला विजेच्या धक्क्यासारखं लागतं. भांडी धुणे खूप अवघड काम होऊन बसतं. त्यामुळे भांडी धुण्याचे हातमोजे घालणे हा हिवाळ्यात भांडी धुण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. होय. रबर किंवा सिलिकॉनचे हातमोजे तुमच्या हातांचे थंड पाण्याच्या थेट संपर्कापासून संरक्षण करतात. यामुळे हात सुन्न होणे आणि त्वचा कोरडी पडणे किंवा जळजळ होणे टाळता येते.

46
डिटर्जंटपासून संरक्षण

हातमोजे घातल्याने तुम्ही जास्त वेळ आरामात भांडी धुूऊ शकता. इतकेच नाही, तर ते तुमच्या हातांचे डिटर्जंट आणि जंतूंपासून संरक्षण करतात. आजकाल जाड, आतून अस्तर असलेले हातमोजेही उपलब्ध आहेत, जे हिवाळ्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. 

56
बजेटनुसार खरेदी करा

स्थानिक किराणा दुकान, सुपरमार्केट किंवा हार्डवेअरच्या दुकानातही भांडी धुण्याचे हातमोजे सहज उपलब्ध असतात. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विविध आकार आणि गुणवत्तेचे हातमोजे उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निवड करू शकता.

66
भांडी धुणे होईल अधिक सोपे

काही हातमोज्यांमध्ये आतून कापसाचा थर असतो, जो थंडीपासून अतिरिक्त संरक्षण देतो. योग्य आकाराचे हातमोजे निवडल्याने चांगली पकड मिळते आणि ते हातातून घसरतही नाहीत. एकदा खरेदी केल्यावर ते अनेक दिवस आरामात वापरता येतात. यामुळे हिवाळ्यात भांडी धुणे अधिक सोपे होते.

Read more Photos on

Recommended Stories