Kitchen Tips : थंडीत मिळणारा मटार दीर्घकाळ ताजा ठेवण्यासाठी ब्लांचिंग करून फ्रीजरमध्ये ठेवणे ही सर्वात उत्तम पद्धत आहे. धुतल्यामुळे ओलावा वाढतो म्हणून दाणे धुवू नये. एअरटाइट पॅकिंग, मीठात साठवणूक आणि मटार पेस्ट बनवून ठेवणे हेही परिणामकारक उपाय आहेत.
हिवाळा आला की बाजारात ताज्या, गोड आणि रसाळ मटारची रेलचेल दिसू लागते. पण हाच मटार संपूर्ण वर्षभर वापरता आला तर? थंडीत उपलब्ध होणारा मटार स्वस्त, ताजा आणि पोषक असतो. मात्र त्याची टिकवण क्षमता कमी असल्याने दिवस-दोन दिवसांतच त्याची गोडी कमी होते. म्हणूनच घरात मटार दीर्घकाळ ताजाच राहावा यासाठी योग्य पद्धतीने साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही सोप्या आणि परिणामकारक टिप्स वापरून तुम्ही मटार ६ महिने ते वर्षभर ताजा ठेवू शकता.
26
मटार धुवून न ठेवता थेट काढून स्वच्छ करा
मटार टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्याची योग्यप्रकारे साफसफाई. मटारच्या शेंगा स्वच्छ पुसून मग त्यातील दाणे वेगळे करा. अनेक जण दाणे वेगळे करून धुऊन ठेवतात, पण धुतल्यामुळे दाण्यांवर ओलावा राहतो आणि बुरशी लागू शकते. त्यामुळे मटारचे दाणे धुवू नयेत, फक्त कोरड्या कापडाने हलके पुसावे. हे दाणे एअर ड्राय करून घ्या म्हणजे त्यावरील नैसर्गिक ओलावा पूर्णपणे निघून जाईल आणि टिकवण क्षमता वाढेल.
36
‘ब्लांचिंग’ पद्धत : मटार ताजा ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग
मटार जास्त दिवस ताजा ठेवायचा असेल तर ‘ब्लांचिंग’ ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे.
एका भांड्यात पाणी उकळा
त्यात मटारचे दाणे २-३ मिनिटे टाका
लगेचच ते बर्फाच्या थंड पाण्यात काढून टाका
या प्रक्रियेने मटारचा रंग, स्वाद आणि पोषक मूल्य जास्त काळ टिकते. ब्लांचिंग केल्यावर मटार कधीही काळसर होत नाही. थोडे कोरडे करून मगच पॅक करा.
ब्लांचिंगनंतर मटार फ्रीजरमध्ये ठेवणे हा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे. फ्रीजर-सेफ पाउच किंवा डब्यात मटार पातळ लेयरमध्ये भरा. हवा पूर्ण काढून टाका. हवा राहिली तर आईस क्रिस्टल तयार होतात आणि चव खराब होते. ही पद्धत वापरल्यास मटार १२ महिने ताजा राहतो आणि वापरतानाही त्याची टेक्स्चर उत्तम राहते.
56
मीठात साठवणीची पारंपरिक ट्रिक
जर तुमच्याकडे फ्रीजर नसेल, तर कोरड्या मीठात मटार साठवता येतात. स्वच्छ काचेच्या बरणीत तळाशी एक लेयर मीठ टाका, त्यावर मटारचे दाणे पसरवा. पुन्हा मीठ आणि मटार असे स्तर बनवत भरा. मीठ ओलावा खेचून घेते आणि मटार लवकर खराब होत नाही. ही पद्धत ग्रामीण भागात अजूनही लोकप्रिय आहे.
66
मटार पेस्ट करूनही ठेवू शकता
मटार मोठ्या प्रमाणात मिळत असेल तर त्याची पेस्ट बनवून फ्रीज करता येते. ब्लांच केलेला मटार मिक्सरमध्ये फिरवून त्यात थोडेसे मीठ मिसळा आणि एअरटाइट पाउचमध्ये भरून फ्रीज करा. ही पेस्ट पराठा, कटलेट, उपमा, पुलाव किंवा चविष्ट ग्रेव्हीमध्ये झटपट वापरता येते.