Kitchen Hacks : फ्लॉवरमधील किड अशी करा स्वच्छ, अन्यथा पडाल आजारी

Published : Oct 28, 2025, 03:00 PM IST

Kitchen Hacks : फ्लॉवरमधील किड काढण्यासाठी मीठाच्या, हळदीच्या किंवा सिरक्याच्या पाण्यात भिजवणे हा सर्वात सोपा उपाय आहे. हे उपाय भाजी स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवतात.

PREV
15
फ्लॉवर स्वच्छ कसा करावा

फ्लॉवर किंवा फुलकोबी ही पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी असली तरी तिच्यात अनेकदा लहान किडे, अळ्या किंवा धूळ-चिखल अडकलेले असतात. यामुळे ती नीट स्वच्छ धुतली नाही, तर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून फुलकोबी शिजवण्यापूर्वी योग्य प्रकारे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊ या फ्लॉवरमधील किड काढून टाकण्याचे सोपे पण प्रभावी घरगुती उपाय.

25
मीठाच्या पाण्यात भिजवा

सर्वात प्रभावी उपाय फुलकोबीतील किड बाहेर काढण्यासाठी मीठाचे पाणी हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. सर्वप्रथम फ्लॉवरचे मोठे देठ कापून लहान तुकडे करा. एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे मीठ घाला. त्यात फ्लॉवरचे तुकडे २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. मीठाच्या पाण्यामुळे आतमध्ये लपलेले किडे आणि अळ्या बाहेर येतात. नंतर हे तुकडे स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन घ्या. हा उपाय केल्यानंतर फ्लॉवर पूर्णपणे स्वच्छ होतो आणि सुरक्षितपणे वापरता येतो.

35
हळदीच्या पाण्याने स्वच्छ करा

मीठाशिवाय हळद देखील एक नैसर्गिक अँटिसेप्टिक आहे. ती फुलकोबीतील जंतू, अळ्या आणि कीटक मारून टाकते. यासाठी एका भांड्यात कोमट पाण्यात एक चमचा हळद घाला आणि त्यात फ्लॉवरचे तुकडे १५ ते २० मिनिटे भिजवा. हळदीच्या पाण्यामुळे केवळ किडे बाहेर पडत नाहीत, तर भाजी निर्जंतुकही होते. नंतर हे तुकडे स्वच्छ पाण्याने धुऊन वापरा.

45
व्हिनेगरचा वापर

जर फुलकोबी खूप घाण किंवा किड लागलेली असेल, तर व्हिनेगर म्हणजेच सिरक्याचा वापर उपयुक्त ठरतो. कोमट पाण्यात दोन मोठे चमचे व्हिनेगर मिसळा आणि त्यात फ्लॉवर १०-१५ मिनिटे ठेवा. व्हिनेगरच्या आम्लीय गुणधर्मामुळे किडे मरतात आणि फ्लॉवर स्वच्छ होतो. या प्रक्रियेनंतर साध्या पाण्याने दोन वेळा धुऊन घ्यावे.

55
उकळत्या पाण्याचा वापर

जर वेळ कमी असेल, तर उकळते पाणी वापरून किड पटकन काढता येते. पाण्याला उकळी आणा आणि त्यात फ्लॉवरचे तुकडे ३ ते ५ मिनिटे ठेवा. उकळत्या पाण्यामुळे लपलेले किडे त्वरित वर येतात. त्यानंतर पाणी गाळून फ्लॉवर थंड पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय केवळ स्वच्छतेसाठीच नव्हे, तर भाजी शिजवताना तिचा रंग आणि कुरकुरीतपणा टिकवण्यासाठीही उपयुक्त असतो.

Read more Photos on

Recommended Stories