वास्तुशास्रात काही पशूपक्षांना शुभ मानले आहे. तर काहींना अशुभ मानले आहे. अशातच वास्तुशास्रानुसार, मांजरीसंदर्भात देखील काही शुभ आणि अशुभ संकेत सांगण्यात आले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया...
मांजर पाळणे शुभ की अशुभ?
धार्मिक मान्यतेनुसार, मांजर पाळणे शुभ मानले जाते. कारण मांजर नकारात्मक उर्जेपासून आपले संरक्षण करते.
मांजरीमुळे घरातील राहुचा प्रभाव वाढू शकतो
काहीवेळेस मांजर पाळणे अशुभही मानले जाते. यामुळे घरातील राहुचा प्रभाव वाढला जाऊ शकतो. अशातच व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या वाढल्या जाऊ शकतात.
घरातील नकारात्मक उर्जा दूर होते
पाळीव मांजरीकडून बाळाला घरात जन्म दिल्यास तेथील सदस्यांची उन्नती होण्याची शक्यता वाढली जाते. याशिवाय घरात नकारात्मक उर्जा येत नाही.
सोनेरी रंगातील मांजर
मांजरी पाळणे त्याच्या रंगावरुन शुभ आणि अशुभ मानले जाते. घरात सोनेरी रंगातील मांजर असल्यास शुभ मानले जाते.
काळ्या रंगातील मांजर अशुभ
घरात काळ्या रंगातील मांजर असल्यास अशुभ मानले जाते. घरात काळ्या रंगातील मांजर रडू लागल्यास अशुभ संकेत मानले जातात. म्हणजेच एखादी दुर्घटना घडण्याचे ते संकेत असतात.
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.