किचनमध्ये काम करताना ताडासन करू शकता. काहीवेळेस दूध अथवा भाजी शिजवताना गॅस समोर उभे रहावे लागते. यावेळी ताडासन केल्याने फायदा होईल आणि तुमचे कामही पूर्ण होईल. ताडासन करण्यासाठी किचनमध्ये फारश्या मोकळ्या जागेची गरज नाही. एकाच ठिकाणी उभे राहून ताडासन करता येते. ताडासन केल्याने शरिराचे पॉश्चर सुधारणे, मानसिक शांतता मिळणे, एकाग्रता वाढणे, पचनक्रिया सुधारणे आणि ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते.