Jyeshtha Gauri Avahana : गौरीला 10 मिनिटांत या 5 वेगळ्या प्रकारे नेसवा साडी

Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणेशोत्सवावेळी गौरी आवाहन असते. यावेळी देवी पार्वतीची पूजा केली जाते. यंदा गौरी आवाहन येत्या 10 सप्टेंबरला असणार आहे. यावेळी गौरीला वेगवेगळ्या पद्धतीने अवघ्या 10 मिनिटांत साडी कशी नेसवायची याचे काही सोपे प्रकार पाहूया…

Chanda Mandavkar | Published : Sep 3, 2024 3:45 AM IST

Jyeshtha Gauri Saree Draping Ideas : महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्वाच्या सणांपैकी गौरी आवाहनचा सण आहे. या वेळी देवी पार्वतीची पूजा केली जाते. याची सुरुवात जेष्ठा गौरी आवाहनापासून पुढील तीन दिवस असते. यंदा गौरी आवाहन 10 सप्टेंबरला असून विसर्जन 12 सप्टेंबरला असणार आहे. गौरी आवाहनावेळी गणपतीसह गौरीची पूजा केली जाते. विवाहित महिला गौरी आवाहनावेळी आपल्या मुलांसह कुटुंबासाठी उपवास ठेवतात.

पौराणिक कथेनुसार, गणेश चतुर्थीच्या दोन दिवसानंतर देवी पार्वती कैलास पर्वतावरुन पृथ्वीवर आली असे सांगितले जाते. गौरी आवाहनावेळी तिचे वाजत-गाजत घरात स्वागत केले जाते. याशिवाय गौरीला श्रृंगार केला जातो. यंदा गौरीला अवघ्या 10 मिनिटांमध्ये साडी कशी नेसवायची याचे काही वेगवेगळे प्रकार पाहूया...

शुभ मुहूर्त आणि विसर्जन
जेष्ठागौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबरला रात्री 08 वाजून 02 मिनिटांनी सुरु होणार आहे. यानंतर जेष्ठागौरीचे विसर्जन12 सप्टेंबरला रात्री 09 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे.गौरीच्या विसर्जनावेळी तिची पूजा आरती केली जाते. गौरीचे विसर्जन केल्यानंतर घरी परत येताना थोडी वाळू घरी आणली जाते. ही वाळू घरभर आणि अंगणातील झाडांवर टाकली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

आणखी वाचा : 

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला दारापुढे काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी डिझाइन

Read more Articles on
Share this article