Ganesh Chaturthi 2024 : मध्यप्रदेशातील गणपती मंदिरात उलटा स्वस्तिक, वाचा कारण

देशभरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या ऐतिसाहिक आणि पौराणिक कथा आहेत. अशातच मध्य प्रदेशातील एका गणपतीबद्दल चर्चा केली जाते. या मंदिरात उलटा स्वस्तिक असल्याचे दिसून येते.

Chanda Mandavkar | Published : Sep 2, 2024 9:13 AM IST

Ganesh Chaturthi 2024 : संपूर्ण भारतात गणपतीची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांना इतिहास आणि पौराणिक कथा आहेत. यापैकीच एक मंदिर म्हणजे मध्य प्रदेशातील इंदौर येथे आहे. इंदौरमधील गणपतीचे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या मंदिरात दूरदूरवरुन भाविक दर्शनासाठी येतात. खास बाब अशी की, गणपतीच्या मंदिरातील भींतीवरील उलटा चष्मा. यामुळे भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

इंदौरमधील गणपतीचे मंदिर
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये काही मंदिरे आहेत. येथेच गणपतीचे एक मंदिर फार प्रसिद्ध आहे. खरजाना गणेश मंदिर नावाने ओखळले जाते. या मंदिरात स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे. खरजाना गणेश मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते. याशिवाय बुधवारी गणपतीची विशेष पूजाही होते. गणेश चतुर्थीवेळी विनायक जयंतीचे आयोजन मोठ्या धुमधडाक्यात केले जाते.

मंदिराचा इतिहास 
इंदौरमधील खजराना येथील गणेश मंदिराची स्थापना वर्ष 1735 रोजी होळकर वंशाच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केली होती. असे म्हटे जाते, औरंगजेबाच्या शासनकाळात ज्यावेळी हिंदू देवी-देवतांची मंदिरे पाडण्यात आली होती. त्यावेळी या मंदिातील गणपतीची मुर्ती एका विहिरीत लपवण्यात आली होती. याच्या काही वर्षानंतर मंदिराचे पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिला.

मंगल भट्ट यांनी ही बाब अहिल्याबाई होळकर यांना सांगितली. त्यावेळी गणपतीची मूर्ती असणाऱ्या ठिकाणी खोदकाम केले. याच ठिकाणी गणपतीची मूर्ती सापडली. यानंतर मंदिराची उभारणी करण्यात आली.

मंदिराच्या भींतीवरील उलटा स्वस्तिक
आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मंदिरातील एक अनोखी प्रथा आहे. येथील मंदिराच्या मागील भिंतीवर भाविकांकडून उलटा स्वस्तिक काढला जातो. यानंतर इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाविक पुन्हा येऊन सुलट स्वस्तिक काढतात. ही प्रथा अनेक वर्षे सुरु आहे. याशिवाय मंदिराला तीन फेऱ्या मारण्यासह मंदिराच्या भींतीवर धागा बांधतात.

देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक
इंदौरमधील खरजाना गणेश मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा समावेश शिर्डीमधील साई बाबा आणि तिरुपती वेंकटेश्वर मंदिरासोबत केला जातो. या मंदिरात खुल्या हाताने भाविक दान करतात.

आणखी वाचा : 

गणपतीची पहिल्यांदाच घरी स्थापना करणार आहात? लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

Ganesh Chaturthi 2024 : शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ घ्या जाणून

Read more Articles on
Share this article