ग्रह नेहमी बदलत असतात. राशी बदलण्यासोबतच नक्षत्रेही बदलत असतात. अशा प्रत्येक बदलामुळे ज्योतिषशास्त्रातल्या १२ राशींचे जीवन बदलते. आता या मे महिन्यातही तीन राशींचे जीवन बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना खूप खास आहे. या महिन्यातील ३१ दिवसांत सूर्य, बुध, राहू, केतू हे ग्रह संचार करतील. तसेच, गुरू ग्रहातील बदल दिसून येईल. वैदिक दिनदर्शिकेनुसार मे महिन्याच्या अखेरीस गुरू ग्रह मृगशीर्ष नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून चौथ्या चरणात प्रवेश करेल. हा संचार मे ३० रोजी होणार आहे.