ओठ कोरडे पडून फुटण्यापासून रोखण्यासाठी काय करावे ते पाहूया.
ओठांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लिप बाम लावणे चांगले आहे.
शिया बटरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ते ओठांचा कोरडेपणा दूर करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
ओठांवर रोज तूप लावून मसाज केल्याने कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
ओठांवर नारळाचे तेल लावून मसाज केल्याने ओठांचा कोरडेपणा कमी होतो.
मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे ओठ फुटण्यापासून रोखण्यासाठी मध मदत करतो. यासाठी मध थेट ओठांवर लावून मसाज करू शकता.
एक चमचा साखर घेऊन त्यात तीन-चार थेंब ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा चमचा मध घालून ओठांवर लावा. नंतर चांगले मसाज करा. दहा मिनिटांनी धुवा.
रोज ओठांवर गुलाब जल लावल्याने कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
फाटलेल्या ओठांचे संरक्षण करण्यासाठी कोरफड जेलचाही वापर करता येतो. यासाठी कोरफड जेल ओठांवर लावून मसाज करा.
Rameshwar Gavhane