International Women's Day 2025 निमित्त 'सुपर वुमन'ला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, Quotes पाठवून साजरा करा खास दिवस

Published : Mar 07, 2025, 02:18 PM IST
international womens day 2025 theme

सार

International Women's Day 2025 Wishes : येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त आयुष्यातील खास महिलेला, मैत्रीणीला मेसेज, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा आजचा दिवस. 

International Women's Day 2025 Wishes : जगभरात प्रत्येक वर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस खासकरुन महिलांना समर्पित असतो. या दिवशी महिलांच्या प्रति आदर, सम्मान, त्यांचे अधिकार यांच्यासह लैंगिक समानतेसह अन्य काही गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. यंदाची महिला दिनानिमित्तची थीम "Accelerate Action" ठेवण्यात आली आहे. अशातच वर्ष 2025 मधील महिला दिनानिमित आयुष्यातील खास मैत्रीण, आई, बहिण किंवा कोणत्याही महिलेला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा आजचा दिवस.

जागतिक महिला दिन 2025 शुभेच्छापत्रे 

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू...

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान" जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”

तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल. - ऑप्रा विन्फ्रे

8 मार्चलाच का महिला दिन?

8 मार्चला महिला दिवस साजरा करण्याची परंपरा वर्ष 1917 मध्ये रशियातील महिलांद्वारे करण्यात आलेल्या आंदोलनासंदर्भातील आहे. यावेळी रशियात ज्युवेलियन कॅलेंडर प्रचलित होते. यानुसार फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा रविवार 23 फेब्रुवारी होता. जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 8 मार्च होता. महिलांनी ब्रेड आणि पीस (रोटी आणि शांती) ची मागणी करत आंदोलन केले. येथून रशियाच्या क्रांतीचा पायंडा पडला. या आंदोलनानंतर जार शासन संपले आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. या ऐतिहासिक घटनेच्या कारणास्तव 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Rice Storage Hacks : तांदळाला वर्षभर कीड लागू नये म्हणून डब्यात ठेवा 'ही' एक गोष्ट!
Chanakya Niti : सगळ्यांवर प्रेम करायला तुम्ही देव नाही, कलियुगात जगायचंय तर चाणक्य बना!