बदलत्या ऋतूत कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या 4 टिप्स

Published : Mar 06, 2025, 09:37 AM IST
skin care

सार

बहुतांशजणांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा महागडे प्रोडक्ट्स वापरले जातात. जाणून घेऊया कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स…

Skin Care Tips : बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही होतो. हवामानातील बदलांमुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि खराब होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील चमक कमी होते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे आणि योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. 

त्वचेचा प्रकार समजून घ्या 

बदलत्या हवामानानुसार प्रथम तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तिला जास्त हायड्रेशनची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ई आणि ग्लिसरीन असलेले मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरू शकते. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी ऑइल फ्री आणि जेल बेस्ड क्रीम्स वापरावीत. जेणेकरुन त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होणे आणि पोर्सही बंद होणार नाहीत.

तूप 

तूपाचा वापर आपण गोड पदार्थ करण्यासाठी किंवा वरण भातावर वरुन घेऊन खाण्यासाठीच करतो मात्र तूपात अनेक औषधी गुण पण आहेत किंवा तूपामुळे अनेक आजार कमी होऊ शकते हे अनेकांना माहितच नसतं. रात्री त्वचेला किंवा ओठाला तूप लावून झोपल्यास त्वचा कोरडी होत नाही आणि नितळ राहण्यास मदत होते.

खोबऱ्याचे तेल

रात्री खोब्र्याचं तेल हातापायाला लावून झोपावे त्याने रात्रभार शरीराला तेल मुरतं आणि त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. धुळीतून घरी आले असाल आणि चेहरा काळा पडला असेल तर चेहऱ्यावर तेल घासावं आणि मग कापसानं पुसून काढावा याने चेहरा डॅमेज होत नाही आणि त्वचा नितळ राहण्यास मदत होते.

लोणी 

हिवाळ्यात ओठं फाटण्याची समस्या सगळ्यांना असते. अनेक लोक वेगवेगळे लिप केअर्स वापरतात. त्यामुळे रात्री झोपताना घरात लोणी असेल तर ओठाला लावून झोपल्यास ओठ नरम राहतात आणि ओठाचा रंग उजळतो.

ग्लिसरीन आणि गुलाब पाणी

ग्लिसरीन १०० मिली आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच 200-250 मीली गुलाब जल एका बॉटल मध्ये एकत्र करुन ठेवा. आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्याच्या वेळी हात पाय धूवून लावा. त्वचा कोरडी पडणार नाही.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV

Recommended Stories

दात पिवळे दिसतात? रोजच्या 'या' ५ चुका ठरतात तुमच्या हसण्याला अडथळा!, कारणे जाणून घ्या
कोंडा झालाय, आता टेन्शन नाही! हे ४ जादुई घरगुती उपाय करा आणि कोंड्याला कायमचा बाय-बाय म्हणा!