Women's Day 2025 Speech : महिला दिनानिमित्त शाळेत देण्यासाठी खास भाषण

Published : Mar 06, 2025, 04:43 PM IST
Women's Day 2025

सार

Women's Day 2025 Speech : येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त शाळेत देण्यासाठी खास भाषण पाहा…

Women's Day 2025 Speech :  येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शाळेत देण्यासाठी खास भाषण पाहूया…

"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली,

तो जिजाऊचा शिवबा झाला,

ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली

तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली,

तो राधेचा श्याम झाला, आणि

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,

तो सीतेचा राम झाला !'

प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !

आज च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो !

शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुखात करतो.

महिला दिन चारोळ्या कविता ( jagtik mahila din kavita charolya )

स्त्री म्हणजे वात्सल्य,

स्त्री म्हणजे मांगल्या

स्त्री म्हणजे मातृत्व,

स्त्री म्हणजे कर्तृत्व

8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.

इतिहासाची पाने चाळली तर... मार्च 1908 रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.

1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी किलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ (मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकाराव असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून (मार्च यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.

 

PREV

Recommended Stories

हिवाळ्यात पायांचे सौंदर्य वाढवा, निवडा फॅन्सी फ्लॉवर जोडवी डिझाइन
फक्त 3 ग्रॅममध्ये रॉयल नथ! लग्नासाठी बनवा 'हे' स्टायलिश आणि मजबूत डिझाईन्स!