थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशातच थंडीत लग्नसोहळ्याला जाण्यापूर्वी त्वचेच्या इंस्टेट ग्लो साठी घरच्याघरी फेस पॅक तयार करू शकता.
Tips for instant glow in winter : सध्या थंडीच्या दिवसांसह लग्नसोहळ्यांनाही सुरुवात झाली आहे. यावेळी चारचौघांत उठून दिसण्यासाठी परफेक्ट आउटफिट्ससह त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यामुळे थंडीत त्वचेला इंस्टेट ग्लो येण्यासाठी घरच्याघरी खास फेस पॅक तयार करू शकता.
कॉफी पावडर आणि नारळाचे तेल
कॉफी पाडर आणि नारळाचे तेल कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय कॉफी पावडर एक्सफोलिएट प्रमाणे त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे त्वचेला ग्लो येते. एक टिस्पून कॉफी पावडर आणि एक टिस्पून नारळाचे तेल एकत्रित करुन फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 10-15 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
बेसन आणि कच्चे दूध
थंडीतील चेहऱ्याच्या त्वचेला इंस्टेट ग्लो येण्यासाठी तीन चमचे कच्चे दूध आणि आणि दोन चमचे बेसन घेऊन त्याची पेस्ट तयार करा. यामध्ये गुलाब पाण्याचा देखील वापर करू शकता. या फेस पॅकमुळे चेहऱ्याला नैसर्गिक रुपात ग्लो येण्यास मदत होईल. याशिवाय त्वचा मऊसर, डेड स्किन आणि मॉइश्चराइज करण्यासाठी बेसन आणि कच्च्या दूधाचा फेस पॅक फायदेशीर ठरू शकतो.
मध आणि कॉफी
इंस्टेट ग्लो साठी चेहऱ्याच्या त्वचेला मध आणि कॉफीचा फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक नैसर्गिक रुपात एक्सफोलिएंटच्या रुपात काम करतो. यामुळे डेड स्किन सेल्स, पिंग्मेंटेशन आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :