Ice Bath : आइस बाथ ट्रेन्डच्या नादात आरोग्याचे होईल नुकसान, जाणून घ्या काय काळजी घ्यावी

Published : Sep 09, 2025, 01:42 PM IST

Ice Bath Trend : आजकाल आइस बाथचा ट्रेन्ड आहे. पण खरंच आइस बाथ प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? खरंतर, आइस बाथ घेण्यापूर्वी आणि नंतर काय करावे याबद्दल जाणून घेऊयाय

PREV
15
आइस बाथचा ट्रेन्ड

आजकाल फिटनेस आणि खेळाडूंसाठी आइस बाथ (Ice Bath) म्हणजेच थंड पाण्यात स्नान करणे ही एक लोकप्रिय पद्धत झाली आहे. कठीण व्यायाम, स्पर्धा किंवा जड शारीरिक श्रमांनंतर शरीरातील स्नायूंना आराम मिळावा, सूज कमी व्हावी आणि शरीर लवकर ताजेतवाने व्हावे म्हणून आइस बाथ घेतले जाते. मात्र, ही प्रक्रिया जितकी उपयुक्त आहे तितकीच योग्य पद्धतीने न घेतल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आइस बाथ घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

25
आइस बाथ घेण्यापूर्वी तयारी

आइस बाथ घेण्यापूर्वी पाण्याचे तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवणे योग्य मानले जाते. त्यापेक्षा जास्त थंड पाणी शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. आइस बाथ १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. त्यासाठी मोठ्या टबमध्ये पाणी भरून त्यात बर्फ टाकावा आणि नंतर हळूहळू शरीर त्यात बुडवावे. थेट थंड पाण्यात उडी घेऊ नये, कारण अचानक तापमान बदलल्याने शरीराला शॉक बसू शकतो.

35
आरोग्याची तपासणी आणि सल्ला

ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, श्वसनासंबंधी आजार किंवा इतर गंभीर समस्या आहेत त्यांनी आइस बाथ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंड पाण्यात स्नान केल्याने रक्तदाब झपाट्याने बदलू शकतो आणि अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवतो. तसेच, लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती महिलांनी आइस बाथ घेणे टाळावे.

45
आइस बाथ दरम्यान काळजी

आइस बाथ घेताना शरीर पूर्ण बुडवायचे की फक्त पाय, गुडघे किंवा स्नायूंचा काही भाग हे गरजेनुसार ठरवावे. चेहरा, छाती किंवा डोकं पूर्णपणे पाण्यात बुडवू नये. आइस बाथ दरम्यान श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवावा आणि थरथर कापू लागल्यास लगेच बाहेर पडावे. त्यावेळी जवळ कोणी तरी मदतीसाठी असणे महत्त्वाचे आहे.

55
आइस बाथनंतरची काळजी

आइस बाथ संपल्यानंतर लगेचच गरम पाण्याने अंघोळ करू नये. शरीराला सामान्य तापमानाला यायला थोडा वेळ द्यावा. गरम कपडे घालून शरीर झाकून ठेवावे आणि कोमट पाणी किंवा गरम पेय घेऊन शरीर उबदार करावे. स्नायू अजूनही दुखत असतील तर हलकी स्ट्रेचिंग किंवा मसाज करावा.

Read more Photos on

Recommended Stories