Published : Jul 30, 2025, 01:07 PM ISTUpdated : Jul 30, 2025, 01:27 PM IST
मुंबई - आपल्याला ७-९ तासांची झोप खूप गरजेची असते असं मानतो. पण खरं तर योग्य वेळी झोपणं आणि झोपेचा दर्जा हा आरोग्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही कधी आणि कसे झोपता हेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे समोर आले आहे.
जास्त झोप घेतल्याने हृदयरोग, डिप्रेशन आणि अकाली मृत्यू होऊ शकतो असा इशारा स्लिप एक्सपर्टकडून वर्षानुवर्षे दिला जात आहे. मात्र, झोपेबाबतच्या जगातील सर्वात मोठ्या अभ्यासातून या चिंतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरा प्रश्न झोपेच्या प्रमाणाचा नसल्याचे या नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
26
प्रत्यक्ष झोप कमीच
लोक सहसा ८ तासांपेक्षा जास्त झोपतो असं सांगतात. पण जेव्हा शास्त्रज्ञांनी फिटनेस ट्रॅकरच्या मदतीने त्यांची खरी झोप मोजली तेव्हा अनेक जण ६ तासांपेक्षा कमी झोपतात हे त्यांना आढळून आले.
36
चुकीचा संबंध जोडला
३ जून २०२५ रोजी हेल्थ डेटा सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सुमारे ९०,००० लोकांना ७ वर्षांपर्यंत ट्रॅक करण्यात आले. यात सहभागी झालेल्यांनी त्यांच्या मनगटावर फिटनेस ट्रॅकर घातले होते. यामुळे त्यांच्या झोपेची अचूक माहिती मिळाली. ८ तासांपेक्षा जास्त झोपतो असं सांगणाऱ्यांपैकी अनेक जण प्रत्यक्षात ६ तास किंवा त्यापेक्षा कमी झोपतात हे आढळून आले. म्हणजेच, पूर्वीच्या अभ्यासांनी झोप आणि आजार यांच्यात चुकीचा संबंध जोडला होता.
या अभ्यासाचे नेतृत्व कॅनडाच्या थर्ड मिलिटरी मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ. किंग चेन यांनी केले होते. तुम्ही किती तास झोपता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही कधी झोपता, किती वेळा जागे होता आणि तुमच्या झोपेचा पॅटर्न दररोज किती स्थिर असतो हे जास्त महत्त्वाचे आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. झोपेतील अडथळे, म्हणजेच कधी उशिरा झोपणे, कधी लवकर झोपणे, कधी पुरेशी झोप न होणे हे १७२ आजारांशी जोडले गेले आहे.
56
हे आजार होऊ शकतात
या संशोधनात झोपेच्या त्रासामुळे पार्किन्सन्स रोगाचा धोका ३७%, टाइप २ मधुमेहाचा धोका ३६% आणि तीव्र किडनी निकामी होण्याचा धोका २२% वाढतो असे संशोधकांना आढळून आले आहे. चांगल्या झोपेमुळे ९२ आजारांपैकी २०% टाळता येऊ शकतात हे देखील आढळून आले आहे.
66
झोप स्थीर असणे महत्त्वाचे
आतापर्यंत आरोग्य तज्ज्ञ ७-९ तासांची झोप घेण्याचा आग्रह धरत होते, पण या अभ्यासातून झोप नियमित आणि स्थिर असणे जास्त महत्त्वाचे आहे हे दिसून आले आहे. अनियमित झोप ही COPD (फुफ्फुसाचा आजार), किडनी निकामी होणे आणि मधुमेह यांसारख्या आजारांच्या धोक्याशी पूर्वीपेक्षा जास्त जोडली गेली आहे. अमेरिकेतील NHANES अभ्यासातूनही या निष्कर्षांना दुजोरा मिळाला आहे.