रशियात आला ८.७ तीव्रतेचा भूकंप, 2025 मध्ये मानवजातीसाठी धोक्याची घंटा? वाचा बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची थरकाप उडवणारी भाकिते

Published : Jul 30, 2025, 09:06 AM ISTUpdated : Jul 30, 2025, 09:10 AM IST

मुंबई - बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांच्या मुंबई हल्ल्यापासून ते ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णिय राष्ट्राध्यक्ष असतील यासंदर्भातील भाकिते खरी ठरली. आज रशियात ८.७ तीव्रतेचा भूकंप आला. त्सुनामीचा इशारा दिलाय. वाचा या दोघांची २०२५ साठीची भाकीते.

PREV
17
मृत्यूपूर्वी अनेक धक्कादायक व आश्चर्यचकित करणाऱ्या भविष्यवाण्या

भविष्याचा मागोवा घेणं हे मानवजातीला नेहमीच आकर्षक वाटले आहे. या अनोख्या आकर्षणाचा भाग ठरले आहेत दोन प्रसिद्ध भविष्यवक्ते, एक, फ्रान्समधील 16व्या शतकातील महान भविष्यवक्ता नास्त्रेदमस आणि दुसरी, 20 व्या शतकात जगलेल्या अंध भविष्यवक्ता बाबा वेंगा. हे दोघेही त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांच्या काही भविष्यवाण्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, विशेषतः 2025 या वर्षाच्या पार्श्वभूमीवर.

नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा : दोन युगांचे भविष्यवक्ते

नास्त्रेदमस यांनी 1555 साली प्रसिद्ध ग्रंथ "Les Prophéties" लिहिला, ज्यामध्ये त्यांनी चारोळ्यांच्या स्वरूपात हजारो भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यामधील काही बाबी, जसे की नेपोलियनचा उदय, हिटलरचा प्रभाव, पहिले व दुसरे महायुद्ध, इत्यादी बाबींचे उल्लेख आजही अचूक मानले जातात.

त्याचप्रमाणे, बाबा वेंगा या बल्गेरियन अंध महिलेने देखील त्यांच्या मृत्यूपूर्वी अनेक धक्कादायक व आश्चर्यचकित करणाऱ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध, हे सर्व त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच भाकीत केल्याचं बोललं जातं.

27
इंग्लंडसाठी काळोखाचे सावट?

नास्त्रेदमस यांच्या मते, 2025 पर्यंत इंग्लंडला भीषण युद्धांना सामोरे जावे लागेल. हे युद्ध केवळ शस्त्रास्त्रांपुरते मर्यादित नसेल, तर त्यामध्ये आतल्या गटांतले संघर्ष आणि बाह्य आक्रमण यांचा समावेश असेल. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, "भूतकाळातील महामारी पुन्हा उद्भवेल, आणि ती जगाच्या अस्तित्वालाच प्रश्न निर्माण करेल."

या युद्धामुळे इंग्लंडचा नाश होईल, असाही इशारा त्यांनी दिला होता. नास्त्रेदमस यांच्या भाकितांप्रमाणे, पाश्चिमात्य देशांची सत्ता हळूहळू कमी होईल आणि नवीन शक्तिशाली राष्ट्र उदयाला येतील. या भाकिताप्रमाणेच इस्रायलने २०२५ मध्ये शेजारी राष्ट्रांवर जोरदार हल्ला केला. तर भारत आणि पाकिस्तानमध्येही संघर्ष उभा राहिला होता.

37
2025 मध्ये पृथ्वीवर विनाश?

बाबा वेंगा यांच्या 2025 वर्षासाठी केलेल्या भविष्यवाण्या खूपच धक्कादायक आहेत. त्यांनी सांगितले होते की, "2025 मध्ये एक प्रचंड भूकंप होईल, ज्यामुळे पृथ्वीवर विनाशाचे चित्र दिसून येईल. युरोपमध्ये महायुद्धाचे सावट गडद होईल." त्यांनी पुढे असेही भाकीत केले की, "रशिया एक महाशक्ती म्हणून उदयास येईल आणि जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित करेल."

या पार्श्वभूमीवर, सध्या चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, त्यातील रशियाची आक्रमक भूमिका आणि जागतिक राजकारणात त्याचे वाढते वजन पाहता, बाबा वेंगाच्या भाकितांना काहीसे सत्याचे किनारे लागल्याचे दिसून येते.

47
दीर्घ युद्ध आणि आर्थिक संकट

नास्त्रेदमस यांनी युक्रेनसारख्या परिस्थितीचं वर्णन करताना लिहिलं होतं की, "एक दीर्घकालीन युद्ध होईल ज्यामुळे सैनिक थकतील. त्यांच्याकडे पैसा नसेल आणि चामडे, पितळ व इतर धातूंपासून नाणी बनवली जातील." या भाकितांमधून दिसते की, महायुद्धाच्या काळात आर्थिक घसरणही होऊ शकते.

अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील ताज्या परिस्थितीत इंधन दर, अन्नधान्य टंचाई आणि चलनवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे सर्व या भविष्यवाण्यांशी सुसंगत वाटते. ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ या दिशेने इशारा करतोय की काय हे बघावे लागेल.

57
पृथ्वीवर आकाशातून आपत्ती?

नास्त्रेदमस यांनी आणखी एक भाकीत केलं होतं, जे लोकांच्या मनात भीती निर्माण करू शकतं, "2025 मध्ये आकाशातून येणारा एक प्रचंड गोळा पृथ्वीवर आदळेल." अनेकांना याचा अर्थ उल्का पडण्यासारखा भासतो. या भाकिताचा वैज्ञनिक आधार शोधणे कठीण असले तरी, अनेक अंतराळ संशोधन संस्था वारंवार पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्कांचा अंदाज घेत असतात.

त्याच वेळी बाबा वेंगांनी सांगितले की, "2025 मध्ये पृथ्वीवर आगीचे गोळे पडतील आणि मोठ्या प्रमाणावर विनाश होईल." हा विनाश नैसर्गिक आपत्तीमुळे होईल की मानवनिर्मित युद्धामुळे, याबाबत निश्चित काहीच सांगता येत नाही.

67
वैद्यकशास्त्रात प्रगती, पण धोकाही?

नास्त्रेदमस व बाबा वेंगा दोघांनीही 2025 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होईल, अशी आशा व्यक्त केली होती. नवीन उपचारपद्धती, दुर्मिळ आजारांवर उपाय, आणि मानवी जीवनशैलीत क्रांती घडवणारे शोध यामुळे मानवी जीवन अधिक सुलभ होईल, असं त्यांनी सांगितलं होतं.

परंतु, या प्रगतीसह काही नैतिक आणि जैविक धोकेही निर्माण होऊ शकतात, असं समजलं जातं, जसे की जैविक शस्त्रांचा वापर, मानवनिर्मित व्हायरस, इत्यादी. २०१९ मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार केला होता.

77
भाकितांवर विश्वास ठेवावा का?

नास्त्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्या भाकितांनी अनेक वेळा खरे ठरण्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निश्चित आहे. मात्र, प्रत्येक भाकीत हे अचूक भाषांतरासह आणि परिस्थितीनुरूप समजून घेणं आवश्यक आहे.

2025 वर्ष मानवजातीसाठी खरोखरच धोकादायक असेल का, याचं उत्तर काळच देईल. पण तरीही, भविष्यकाळाकडे सजग दृष्टीने पाहणं आणि नैतिक, सामाजिक आणि शास्त्रीयदृष्ट्या सज्ज राहणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे.

Read more Photos on

Recommended Stories