भारतीय संस्कृतीत पूजा हा धार्मिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र, पूजा करताना काही नियम आणि शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. पूजेसाठी स्वच्छता, योग्य विधी आणि भक्तिभाव महत्त्वाचा असतो, असे तज्ज्ञ सांगतात.
शारीरिक स्वच्छता: स्नान करूनच पूजा करावी आणि स्वच्छ वस्त्र धारण करावे.
पूजास्थळी स्वच्छता: देवघरातील मूर्ती किंवा फोटो धूळमुक्त ठेवावेत आणि पूजेचे साहित्य शुद्ध असावे.
योग्य पूजासामग्री वापरा: ताज्या फुलांचा नैवेद्य, शुद्ध तुपाचा दिवा आणि पवित्र गंगाजलाचा वापर करावा.
मंत्रोच्चार योग्य प्रकारे करा: मंत्रांचे स्पष्ट उच्चारण करावे आणि पूजा एकाग्रतेने करावी.
नैवेद्याची शुद्धता: प्रसाद तयार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी आणि अन्न वाया जाऊ नये.