हा लेख शिवरात्रीच्या उपवासासाठी कुरकुरीत साबुदाणा वडे बनवण्याची सोपी कृती सांगतो. यामध्ये साबुदाणा कसा भिजवावा, बटाटे आणि दाण्याच्या कुटासोबत मिश्रण कसे तयार करावे आणि वडे कुरकुरीत होण्यासाठी कसे तळावेत याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
शिवरात्रीच्या उपवासाला कडक साबुदाणा वडे कसे बनवावेत, प्रोसेस माहित झाल्यावर म्हणाल हे तर किती सोपं
घरच्या घरी कुरकुरीत आणि कडक साबुदाणा वडे बनवता येतात. आपण ते कशा पद्धतीने बनवता येतील हे जाणून घेऊयात.
26
साहित्य
१ कप साबुदाणा, २ मध्यम आकाराचे बटाटे, ½ कप भाजलेले दाण्याचे कूट, २–३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), १ चमचा जिरे, मीठ चवीनुसार, थोडी कोथिंबीर, तळण्यासाठी तेल
36
साबुदाणा भिजवण्याची टिप
साबुदाणा २ तास स्वच्छ धुवून फक्त १ कप पाणी घालून मुरवून ठेवा. जास्त पाणी टाळा, नाहीतर वडे तुटतात. दाणे मोकळे, पसरट आणि चिकट नसावे.