Bread Without Maida : मैदा, अंडी आणि ओव्हनशिवाय कुकरमध्ये बनवा मऊ लुसलुशीत ब्रेड!

Published : Oct 01, 2026, 03:19 PM IST

Bread Without Maida: मैदा, अंडी आणि ओव्हनशिवाय घरच्या घरी कुकरमध्ये ब्रेड कसा बनवायचा? यासाठी लागणारे साहित्य, सोपी कृती आणि मऊ ब्रेड बनवण्याच्या खास टिप्स नक्की जाणून घ्या.

PREV
15
घरच्या घरी ब्रेड बनवायचाय?

तुम्हाला घरच्या घरी ब्रेड बनवायचा आहे का? ओव्हन नाही म्हणून काळजी करताय? आता मैदा आणि अंड्याशिवाय, घरात असलेल्या रव्यापासून तुम्ही साध्या कुकरमध्ये मऊ ब्रेड किंवा केक बनवू शकता.

यासाठी जास्त खर्च किंवा अवघड साहित्याची गरज नाही. नाश्ता असो वा संध्याकाळचे स्नॅक्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा रव्याचा ब्रेड नक्की आवडेल.

ओव्हनशिवाय कुकरमध्ये हा ब्रेड कसा बनवायचा? साहित्य काय लागेल? योग्य पद्धत कोणती? कुकरमध्ये किती वेळ बेक करावे लागेल? चला तर मग, संपूर्ण कृती जाणून घेऊया.

25
ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा - १ कप

दही - १/२ कप

दूध - १/२ कप (गरजेनुसार)

साखर - ३ ते ४ टेबलस्पून

तेल किंवा वितळलेले बटर - २ टेबलस्पून

मीठ - एक चिमूटभर

वेलची पावडर - १/२ टीस्पून

बारीक केलेले काजू/बदाम - २ टेबलस्पून

35
ब्रेड बनवण्याची सोपी कृती
  • रवा थोडा जाडसर असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या. तो खूप बारीक करण्याची गरज नाही.
  • एका भांड्यात रवा, दही, साखर आणि मीठ एकत्र करून चांगले मिसळा. त्यानंतर दूध, पाणी आणि तेल थोडे-थोडे घालून घट्ट पीठ तयार करा.
  • हे मिश्रण सुमारे २०-३० मिनिटे झाकून ठेवा. रवा दूध शोषून घेतो आणि पीठ घट्ट होते. पीठ खूप घट्ट वाटल्यास तुम्ही त्यात थोडे दूध घालू शकता.
45
पीठ चांगले मुरू द्या

भिजवलेल्या पिठात तेल किंवा वितळलेले बटर आणि वेलची पावडर घालून हाताने चांगले मळून घ्या. त्यानंतर पीठ झाकून सुमारे एक तास मुरू द्या.

एक तासानंतर पीठ चांगले फुगलेले दिसेल. या पिठाला चपातीसारखे हलक्या हाताने लाटून आणि दुमडून आकार द्या.

हे पीठ एका भांड्यात ठेवून ३० मिनिटे पुन्हा मुरू द्या. त्यानंतर पिठाच्या वरच्या बाजूला थोडे तेल लावून त्यावर बारीक केलेले काजू आणि बदाम घाला.

55
कुकरमध्ये ब्रेड कसा बेक करायचा?
  • कुकरच्या तळाशी थोडे मीठ घाला आणि त्यावर एक छोटा स्टँड ठेवा.
  • कुकरचे झाकण लावून ५-१० मिनिटे मध्यम आचेवर प्री-हीट करा.
  • आता पिठाचे भांडे कुकरमधील स्टँडवर ठेवा.
  • कुकरची शिट्टी आणि रबर (गॅस्केट) काढून झाकण लावा. मध्यम किंवा मंद आचेवर सुमारे ३०-४० मिनिटे ब्रेड बेक होऊ द्या.
  • ३० मिनिटांनंतर टूथपिक किंवा काडी खुपसून तपासा. पीठ चिकटले नाही तर ब्रेड तयार आहे.
  • पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून सर्व्ह करा.
Read more Photos on

Recommended Stories