पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यात फ्रिजची सोय नव्हती. तरीही मळलेली कणीक खराब होऊ नये आणि ती सुकू नये, यासाठी लोक काही खास देशी पद्धती वापरायचे. आज आपण तेच भन्नाट उपाय जाणून घेणार आहोत.
मळलेली कणीक बाहेर ठेवली की ती लगेच सुकते, कडक होते किंवा काळी पडते. अनेकांच्या घरात फ्रिज नसतो किंवा काहींना फ्रिजमध्ये कणीक ठेवायला आवडत नाही. अशा वेळी खेड्यापाड्यातले जुने लोक फ्रिजशिवाय कणीक तासनतास मऊ ठेवण्यासाठी एक भन्नाट देशी ट्रिक वापरायचे.
26
ओल्या कपड्याची कमाल
तुम्ही मळलेली कणीक उघडी ठेवली तर हवेमुळे ती कडक होते. त्यामुळे कणीक एका स्वच्छ भांड्यात ठेवा आणि त्यावर थोडासा ओलसर सुती कपडा झाकून ठेवा. कपड्यातून पाणी गळणार नाही याची काळजी घ्या, तो फक्त ओलसर असावा. यामुळे कणीक अजिबात सुकत नाही.
36
कणकेवर थोडं तेल लावा
कणकेच्या गोळ्यावर बोटांनी एक-दोन थेंब तेल हलक्या हाताने लावा आणि मग ती झाकून ठेवा. हे तेल कणकेतला ओलावा हवेत उडून जाण्यापासून रोखतं आणि एका संरक्षक कवचासारखं काम करतं.
मळलेली कणीक गॅस शेगडी, ओव्हन किंवा उन्हात कधीच ठेवू नका. स्वयंपाकघरातल्या एखाद्या थंड आणि सावलीच्या कोपऱ्यात ती ठेवा. खेड्यांमध्ये लोक कणीक स्वच्छ मातीच्या भांड्यात ठेवायचे. मातीचं भांडं नैसर्गिकरित्या थंड असतं, त्यामुळे कणीक लवकर आंबत नाही.
56
गरजेपुरतीच कणीक मळा
गरजेपुरतीच कणीक मळा घरात फ्रिज नसेल तर दिवसभराची किंवा दुसऱ्या दिवसाची कणीक एकदम मळून ठेवू नका. त्याऐवजी तुम्हाला जेवढी गरज आहे, तेवढीच कणीक मळणं जास्त शहाणपणाचं ठरतं. यामुळे तुम्हाला नेहमी ताज्या आणि मऊ चपात्या खायला मिळतील.
66
उन्हाळ्यात घ्या ही विशेष काळजी
उन्हाळ्यात घ्या ही विशेष काळजी उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात बाहेर ठेवलेली कणीक काही तासांतच आंबण्याची शक्यता असते. जर कणकेतून आंबट वास येत असेल किंवा ती खूपच चिकट झाली असेल, तर ती अजिबात वापरू नका.