आपण रोज भांडी घासतो आणि गॅस पुसून घेतो. पण फक्त ओटा आणि भांडी स्वच्छ केली, म्हणजे संपूर्ण किचन स्वच्छ झालं असा याचा अर्थ होत नाही.
Image credits: pinterest
Marathi
किचन पुसण्याचा कपडा
आपण गॅस पुसायला, हात पुसायला किंवा गरम भांडी पकडायला एकच कपडा वापरतो. या कपड्यामध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे हा कपडा गरम पाण्यात धुणं खूप गरजेचं आहे.
Image credits: pinterest
Marathi
भांडी घासायचा स्पंज
भांडी घासण्याचा स्पंज वरून स्वच्छ दिसू शकतो. पण सतत वापरल्या जाणाऱ्या या स्पंजमध्येच जंतू लपलेले असतात. आपण आठवड्यातून एकदा तरी हा स्पंज बदलायला हवा.
Image credits: pinterest
Marathi
किचन सिंक
किचनमधली सगळी घाण सिंकमधूनच वाहून जाते. सिंक वरून स्वच्छ दिसत असलं, तरी त्याच्या आत भरपूर बॅक्टेरिया जमा झालेले असतात. त्यामुळे ते रोज घासून स्वच्छ करायला हवं.
Image credits: pinterest
Marathi
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
किचन फक्त दिसायला स्वच्छ असून चालत नाही, तर तिथे वापरली जाणारी प्रत्येक वस्तू खरोखरच स्वच्छ आहे का, याची खात्री आपण करायला हवी.