कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेलं? या 4 टिप्सने ओखळा

उन्हाळ्याच्या दिवसात  शरिराला डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन केले जाते. यापैकीच एक म्हणजे कलिंगड. सध्या मार्केटमध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणात दिसतात. पण इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड कसे ओळखायचे? याबद्दल जाणून घेऊया…

Injected Watermelon : उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. कलिंगडमध्ये काही महत्त्वाचे व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. खासकरुन व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. याशिवाय कलिंगडचे सेवन केल्याने उन्हाळ्याच्या दिवसात डोळे, त्वचेसह हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. कडाक्याच्या उन्हापासून शरिराला थंडावा मिळावा आणि शरिरातील पाण्याची पुर्तता पूर्ण होण्यासाठी बहुतांशजण कलिंगडचे सेवन करतात.

मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कलिंगड विक्री केले जात असल्याचे दिसून येते. अशातच केमिलयुक्त आणि इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड लालबुंद आणि गोड लागतात. पण इंजेक्शनयुक्त कलिंगडचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे की नाही कसे ओळखायचे याबद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊया...

कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेलं असे ओखळा

केमिकलयुक्त कलिंगडामुळे आरोग्यासंबंधित समस्या
केमिकलयुक्त कलिंगडच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित काही आजारांचा सामना करावा लागतो. कलिंगडात मिक्स करण्यात आलेले आर्टिफिशिअल रंगांमुळे फूड पॉइजनिंगची समस्या उद्भवू शकते. याशिवाय इंजेक्शन दिलेल्या कलिंगडमध्ये नाइट्रोजन, कॅल्शिअम कार्बाइडसारखे केमिकल तुमच्या यकृत आणि किडनीमध्ये काही समस्या निर्माण करू शकतात. यामुळे पचनासंबंधित समस्येसह कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला जातो. अशातच केमिकलयुक्त कलिंगडचे सेवन करणे टाळावे.

आणखी वाचा : 

भातात पाणी अधिक झालेय? या 6 टिप्सने चिकटपणा होईल दूर

Health Care : महिलांनो वयाच्या तिशीनंतर अशी घ्या आरोग्याची काळजी, रहाल फिट आणि हेल्दी

Share this article