भातात अधिक पाणी झाल्याने अधिक मऊ झाल्यास त्यामध्ये थोडे आणखी पाणी टाका आणि गाळणीत टाका. यामुळे भातातील अत्याधिक पाणी निघून जाण्यासह अधिक मऊ देखील होणार नाही.
भात मऊ किंवा चिकट झाल्यास एका प्लेटमध्ये सर्वप्रथम काढून घ्या. यानंतर सर्वत्र पसवरुन थोडावेळ ठेवल्यास त्यामधील चिकटपणा दूर होईल.
नव्या तांदळाचा भात करताना यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. यामुळे भात चिकट होणार नाही. तरीही चिकट झाल्यास त्यात एक चमचा तूप टाका.
भातातीत अतिरिक्त पाणी काढण्यास ब्रेड स्लाइसचा वापर करू शकता. भातावर ब्रेड स्लाइस ठेवल्याने त्यामधील अधिक पाणी शोषले जाईल.
भात अधिक चिकट आणि मऊ झाल्यास सर्वप्रथम एका ट्रे मध्ये पसरवा. यानंतर पंख्याखाली सुकण्यास ठेवू शकता. अथवा ओव्हनमध्ये 5-10 मिनिटांसाठी ठेवू शकता.
भात व्यवस्थितीत शिजण्यासाठी योग्य माप घ्या. एक कप भातात दोन कप पाणी घ्या. पण तांदूळ नवा असल्यास पाणी थोड कमी टाका आणि जुना तांदूळ असल्यास दीड कप ग्लास पाणी टाका.