Weight Loss : केवळ तीन मिनिटांच्या व्यायामाने कमी होईल लठ्ठपणा आणि रहाल तंदुरुस्त, पाहा 4 सोप्या Exercise

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत:कडे पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच वजन वाढणे, आरोग्यासंबंधित समस्या मागे लागतात. खरंतर, हेल्दी आणि फिट राहणे काळाची गरज आहे. दिवसभरातून केवळ तीन मिनिटे काढून व्यायाम केल्यानेही तुम्ही फिट राहू शकता.

Weight Loss Tips : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी शारिरीक हालचाल होणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशातच दिवसभरातील केवळ तीन मिनिटांचा वेळ काढून व्यायाम केल्यानेही तंदुरुस्त राहू शकता. यासाठी फार काही करण्याची गरज नाही. जिमला न जाता घरच्याघरीच सोप्या व्यायामाच्या काही प्रकारांनी हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होईल.

एका संशोधनानुसार, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते मध्यरात्रीदरम्यान एखाद्या लठ्ठ व्यक्तीने शारिरीक हालचाल केल्यास त्याच्या आरोग्यात सुधारणा होते. लठ्ठ व्यक्तींमध्ये हृदयासंबंधित आजार मागे लागण्याची शक्यता फार असते. अशातच साधा आणि सोपा व्यायाम करुन देखील वजन कमी होऊ शकते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

स्टार जंप
स्टार जंप करण्यासाठी एखाद्या ट्रेनरची मदत घेऊ शकता. अथवा युट्यूबवर व्हिडीओ पाहून करू शकता. जवळजवळ 30 सेकंद स्टार जंप केल्याने तुमच्या शरिराचे तापमान वाढले जाईल. यावेळी हृदयाचे ठोकेही वाढतात. ही पहिली स्टेप असेल.

बॉडीवेट स्क्वॉट
कंबरेखालील भाग अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी बॉडीवेट स्क्वॉट करा. यामुळे पायाकडील स्नायूंवर ताण येत रिलॅक्स वाटेल.

माउंटेन क्लाइंबर्स
माउंटेन क्लाइंबर्स मिनी हिट वर्कआउट असल्याचे म्हटले जाते. यामध्ये पोटाच्या आसपासचे स्नायू अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी 30 सेकंदापर्यंत माउंटेन क्लाइंबर्स एक्सरसाइज करा. ही संपूर्ण एक्सरसाइज तीन वेळा करा.

कार्डिओ
कार्डिओ एक्सरसाइजमध्ये बर्पीज, हाय नीज, स्किपिंगसारख्या एक्सरसाइज केल्या जातात. यामध्ये हृदयाचे ठोके वेगाने वाढले जातात. अशा एक्सरसाइजमुळे हृदयाचे आरोग्य सुधारले जाते.

या गोष्टीही लक्षात ठेवा

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Health Care : महिलांनो वयाच्या तिशीनंतर अशी घ्या आरोग्याची काळजी, रहाल फिट आणि हेल्दी

ना अधिक डाएट आणि जिम...घरच्याघरी राहून करा ही 6 कामे, वजन होईल कमी

Share this article