How to drink whiskey : दारू घेणारे व्हिस्कीला प्राधान्य देतता. हे एक क्लासिक ड्रिंक आहे. पण अनेकांना ती योग्यरित्या कशी प्यावी हे माहित नसल्यामुळे ते चव आणि अनुभव गमावतात. एक परफेक्ट पेग एन्जॉय करण्यासाठी काही सोपे नियम पाळले पाहिजेत.
व्हिस्की कोणत्या ग्लासमध्ये दिली जाते, याचा तिच्या चवीवर परिणाम होतो. रॉक ग्लास किंवा टंबलर ग्लासमध्ये व्हिस्की पिणे उत्तम. प्लास्टिकच्या ग्लासमध्ये प्यायल्यास व्हिस्कीचा खरा सुगंध कमी होतो.
25
बर्फाचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या
व्हिस्की थोडी थंड करून पिणे चांगले असते. पण जास्त बर्फ टाकल्यास ड्रिंक पातळ होते. लहान क्युब्सऐवजी मोठे आईस क्यूब किंवा व्हिस्की स्टोन्स वापरा. व्हिस्की पिताना 'बॅलन्स' खूप महत्त्वाचा असतो.
35
किती पाणी मिसळावे?
व्हिस्कीमध्ये पाणी घातल्यास चव बिघडते, असे अनेकांना वाटते. पण थोडे पाणी घातल्याने व्हिस्कीमधील लपलेले फ्लेवर्स बाहेर येतात. जास्त पाणी घातल्यास व्हिस्कीची चव कमी होते.
बाटली उघडल्याबरोबर ग्लासात ओतून पिण्याची अनेकांना सवय असते. पण चांगल्या अनुभवासाठी 1-2 मिनिटे तिला हवेत राहू द्या. यामुळे तिचा सुगंध पूर्णपणे बाहेर येतो. वाईनसाठी हवा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच व्हिस्कीसाठीही आहे.
55
प्रमाणात पिणे हे देखील महत्त्वाचे आहे
'परफेक्ट पेग' म्हणजे योग्य प्रमाणात पिणे. साधारणपणे 30 मिली ते 60 मिली पुरेसे आहे. यापेक्षा जास्त प्यायल्यास डोकेदुखी होऊ शकते. मनाला वाटेल तसे प्यायल्यास आरोग्य बिघडते.