उशी बनवणाऱ्या कंपन्या मऊ, कडक, मेमरी फोम आणि महागड्या उशा विकतात. पण चांगली उशी म्हणजे ती तुमच्या झोपण्याच्या पद्धतीला आणि शरीराला साजेशी असावी, असं डॉक्टर सांगतात. रात्री २ वाजता उठून उशी थोपटणं, दुमडणं किंवा थंड बाजूला वळवणं, हे अनेकांना करावं लागतं. पण खरंच 'परफेक्ट' उशी असते का? यामागचं विज्ञान काय आहे?
24
डोकं, मान आणि खांदे एका रेषेत
बाजारात कापसाच्या किंवा वेगवेगळ्या आकाराच्या उशा मिळतात. पण डोकं, मान आणि खांदे एका सरळ रेषेत राहायला मदत करेल, तीच उशी सर्वात उत्तम असते. कुशीवर झोपणाऱ्यांसाठी कान आणि खांद्यामध्ये अंतर असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी उंच आणि कडक उशी योग्य ठरते. पाठीवर झोपणाऱ्यांसाठी मध्यम उंचीची उशी चांगली असते, ज्यामुळे हनुवटी छातीकडे ढकलली जात नाही.
पालथं झोपणाऱ्यांची मान वळलेली असते, त्यामुळे त्यांना डोकं आणि मानेला आधार देणारी चपटी उशी पुरेशी असते. सगळ्यांना एकाच उंचीची उशी चालत नाही. ज्यांचे खांदे रुंद आहेत आणि जे मऊ गादीवर झोपतात, त्यांचे खांदे गादीत रुततात, त्यामुळे त्यांना कमी उंचीची उशी लागू शकते.
34
मानदुखी, घोरणं आणि उशीचं आयुष्य
सकाळी उठल्यावर मान किंवा खांद्यामध्ये दुखत असेल आणि ते अर्ध्या तासात बरं होत असेल, तर तो उशीचा किंवा झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीचा परिणाम असू शकतो. पण जर वेदना दिवसभर टिकून राहिल्या, वाढल्या किंवा हातात मुंग्या आल्या, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अनेकदा लॅपटॉपसमोर चुकीच्या पद्धतीने बसल्याचा त्रास असतो, पण लोक उशीला दोष देतात.
घोरणं थांबवण्यासाठी उशांवर उशा ठेवणं किंवा मान जास्त ताणून ठेवणं फायद्याचं नसतं. झोपेच्या समस्यांसाठी डॉक्टरांनाच भेटा. महागडी उशी नेहमीच चांगली असते, असा कोणताही पुरावा नाही. कुलिंग जेल असलेल्या उशा काही विशिष्ट गरजांसाठी उपयोगी ठरू शकतात. तुमची उशी दुमडल्यावर जर ती मूळ आकारात परत येत नसेल, तर ती खराब झालीये असं समजा. सिंथेटिक उशा १-२ वर्षं आणि मेमरी फोम उशा २-३ वर्षं टिकतात.
काम, सोशल मीडिया आणि वेब सिरीज यामुळे आपल्या झोपेची वेळ कमी होतेय. स्लीप ट्रॅकर्स फक्त मोजमाप करतात, त्याच्या स्कोअरच्या मागे धावल्याने 'बेड टाईम एन्झायटी' वाढू शकते. रात्री साधारण ८ तास झोपायचं ध्येय ठेवा. मध्यरात्री जाग आली तरी ५-१० मिनिटांत पुन्हा झोप लागली पाहिजे. सकाळी उठल्यावर मान न आखडता फ्रेश वाटत असेल, तर तुमची उशी अगदी योग्य काम करत आहे, हे समजून जा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.