लांबसडक आणि घनदाट केस असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. पण ताणतणाव, चुकीचा आहार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळतीची समस्या वाढते. हीच केस गळती थांबवून केसांची वाढ करण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय नक्की करून पाहा.
लांब, दाट आणि सुंदर केस सर्वांनाच आवडतात. पण आजकाल केस गळणे, विरळ होणे, फाटे फुटणे अशा समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. या समस्या कमी करण्यासाठी काही लोक महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. पण घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीही तुम्ही केस मऊ आणि निरोगी ठेवू शकता. दह्यात मेथीचे दाणे मिसळून लावल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतात. चला तर मग, हा हेअर पॅक कसा बनवायचा ते पाहूया.
26
दही आणि मेथी दाण्यांचे फायदे
दही आणि मेथीचे दाणे दोन्हीही घरात सहज मिळतात. केसांना दही लावल्याने ते मऊ होतात आणि गुंता कमी होतो. कोरड्या केसांसाठी तर हे खूपच फायदेशीर आहे. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरसारखी पोषक तत्त्वे असतात. दह्यामध्ये मेथीची पेस्ट मिसळून लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते आणि केस दाट होण्यास मदत होते.
36
केसांना कसे लावावे?
सुरुवातीला केस हळूवारपणे विंचरून गुंता काढून घ्या. त्यानंतर दही आणि मेथीचे तयार केलेले मिश्रण केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावा. हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. गरज वाटल्यास तुम्ही सौम्य शाम्पूचा वापर करू शकता. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसेल.
हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे ताजे दही आणि एक चमचा मेथीचे दाणे लागतील. सर्वात आधी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची बारीक पेस्ट करून घ्या. नंतर एका वाटीत दही घेऊन त्यात मेथीची पेस्ट घाला आणि चांगले मिसळा. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालू शकता. हे मिश्रण तयार केल्यानंतर लगेच वापरणे जास्त फायद्याचे ठरते.
56
निरोगी केसांसाठी..
केस निरोगी राहण्यासाठी हेअर मास्कसोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळणेही तितकेच गरजेचे आहे. तुमच्या रोजच्या आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश असल्याची खात्री करा. डाळी, अंडी, पालेभाज्या, फळे आणि सुकामेवा यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
66
या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
दही आणि मेथीचे दाणे हे जरी नैसर्गिक असले तरी ते सर्वांनाच सारखेच सूट करतील असे नाही. त्यामुळे आधी पॅच टेस्ट करून घेणे उत्तम. जर तुम्हाला डोक्याला खाज येत असेल किंवा संसर्ग झाला असेल तर हे मिश्रण वापरू नका. तसेच, हे लावल्यावर जर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल तर लगेच धुवून टाका.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.