सुक्या किंवा रस्सा भाजीत मीठ जास्त पडलेय? वापरा या ट्रिक्स

Published : Nov 22, 2024, 09:43 AM IST
how-to-make-butter-paneer-masala-without-onion-and-garlic

सार

अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. पण पदार्थांमध्ये मीठ अधिक पडल्यास त्याची चव बिघडली जाते. अशातच सुक्या किंवा रस्सा भाजीत मीठ अधिक पडल्यास काय करावे याबद्दलच्या खास ट्रिक्स जाणून घेऊया...

Kitchen Hacks : मनापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चव अधिक वाढली जाते असे म्हटले जाते. हेच कारण आहे की, शहर किंवा घरापासून दूर गेल्यानंतर आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते. पण स्वत: च्या हाताने एखादा पदार्थ तयार केल्यानंतर त्याची चव फार वेगळी लागते. अशातच सुक्या किंवा रस्सा भाजीत मीठ अधिक झाल्यास काय करावे हे कळत नाही. तर जाणून घेऊया भाजीत मीठ अधिक झाल्यास कोणत्या ट्रिक्स वापरू शकता याबद्दल सविस्तर...

रस्सा भाजीत मीठ अधिक झाल्यास...

  • रस्सा भाजीत मीठ अधिक झाल्यास ग्रेव्हीमध्ये थोडेसे पाणी घाला. यावेळी गरम पाण्याचा वापर करावा.
  • दुसरी ट्रिक म्हणजे, सर्वप्रथम गॅसवर पॅन गरम करुन त्यामध्ये भाजी घाला आणि परतून घ्या. या ग्रेव्हीमध्ये पीठाचे लहान गोळे करुन मिक्स करा. पीठाचे गोळे भाजीमधील अत्याधिक मीठ शोषून घेईल.
  • भाजलेले बेसनही अत्याधिक मीठ झालेल्या रस्सा भाजीत वापरू शकता. यामुळे भाजीतील मीठ समप्रमाणात होईल.

सुक्या भाजीत मीठ अधिक झाल्यास...

  • सुक्या भाजीत मीठ अधिक झाल्यास त्याचे प्रमाण कमी करणे थोडे कठीण होते.
  • सुक्या भाजीतील अत्याधिक मीठ कमी करण्यासाठी त्यामध्ये एखादी आंबट वस्तू घाला. जसे की, लिंबाचा रस. अथवा लहान आकारात टोमॅटो कापूनही घालू शकता.
  • भाजलेल्या बेसनच्या ट्रिकनेही सुक्या भाजीतील मीठ कमी करू शकता.

 

आणखी वाचा : 

थंडीच्या दिवसात खा या 3 प्रकारचे मुरांबे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

मानसिक आरोग्यासाठी घातक ठरतात या 5 सवयी, आजच दूर रहा

PREV

Recommended Stories

हिऱ्यांचा लूक फक्त ₹2K मध्ये! स्टोन वर्कसह चांदीच्या मंगळसूत्र डिझाईन्स; पाहा बजेटमधील 'डायमंड' कलेक्शन!
घराची शोभा वाढवतील ही ५ रंगीबेरंगी पानांची इनडोअर रोपे, हिवाळ्यात घरात करा लागवड