
मेष - प्रेमात आज तुम्हाला चांगलं यश मिळण्याची दाट शक्यता आहे. एखादी जुनी मौल्यवान वस्तू तुमच्या हाती लागू शकते. क्रीडा क्षेत्राशी जोडलेल्या लोकांची प्रगती होईल. अहंकारामुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी वाद वाढू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि तणाव वाढल्याने चिंता राहील. दुसऱ्याच्या मालमत्तेची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. घरी पाहुण्यांचं आगमन होईल. प्राण्यांपासून दुखापत होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. एखादी वाईट बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. जेवणावरून घरात खटके उडू शकतात. भावंडांच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील.
वृषभ - व्यवसायात कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवा. तुमच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने तुम्ही सर्वांची मनं जिंकून घ्याल. नोकरी किंवा कंपनीत बदलाचे योग आहेत. मानसिक अस्वस्थता वाढू शकते. घरातील मोठ्यांचा सल्ला माना आणि त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ नका. ऑफिसमध्ये उशिरा का होईना पण तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि नाव होईल. आज एखादी सामाजिक किंवा सार्वजनिक कामाची जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. वरिष्ठांशी विनाकारण वाद घालणं टाळा. संगीताकडे आज अधिक कल राहील. रस्त्याने जाताना काळजी घ्या, हात-पायाला दुखापत होण्याची किंवा हाड मोडण्याची शक्यता आहे.
मिथुन - मुलांकडून आज एखादी खूप चांगली बातमी किंवा संधी चालून येऊ शकते. भावासोबत मतभेद वाढू शकतात. आज काही महत्त्वाच्या कर्तव्यांचे पालन करावे लागेल. शस्त्रक्रियेनंतर आजारातून सुटका किंवा आराम मिळण्याची शक्यता आहे. शंकेवरून जोडीदारासोबत खटके उडू शकतात. व्यापारात चांगली प्रगती दिसून येईल. मनाची चंचलता वाढेल. उच्च शिक्षणासाठी आजचा काळ फारसा अनुकूल नाही. आईच्या आरोग्याची चिंता भेडसावू शकते. घरातील मोठ्या लोकांसोबत वेळ छान जाईल. लहान मुलांना मदत करावी लागेल. घर आणि बाहेरची दुहेरी जबाबदारी सांभाळताना दमछाक होईल.
कर्क - दुखापत होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. मोठ्यांचे ऐकले नाही तर नुकसान होऊ शकते. फसवणूक होण्याचे योग आहेत, त्यामुळे सतर्क राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आजचा खर्च जास्त असल्याने विचारपूर्वक पैसे वापरा. घरातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करा. नेहमीच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. मुलांच्या चिंतेने मन व्याकुळ राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. राजकारणातील लोकांची प्रतिष्ठा वाढेल. वादविवाद टाळा, प्रकरण कायदेशीर वादात अडकू शकते. संभाषण कौशल्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. मित्राची मोठी मदत होईल.
सिंह - व्यापारात चांगला फायदा होऊ शकतो. ऑफिस किंवा ऑफिसचे ठिकाण बदलण्याची संधी मिळेल. अतिरिक्त खर्चामुळे वाद संभवतात. नवीन मित्रांशी संपर्क होईल. काही रचनात्मक कामांमुळे तुमची प्रगती होईल. मालमत्तेवरून घरातील वाद वाढू शकतात. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण येतील. आज तुमचा राग अनावर होऊ शकतो. दिवसभर मनात अस्वस्थता राहील. कलाकार मंडळींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात सुख-समृद्धी परत येईल. संकटाच्या वेळी स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल. पोटाचा त्रास किंवा वेदना वाढू शकतात.
कन्या - स्वतःच्या हट्टापायी घरात वाद निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये चांगल्या यशाचा योग आहे. बचतीसाठी नव्या योजना आखू शकाल. खर्चाच्या मुद्द्यावरून जोडीदाराशी मतभेद होतील. रक्तदाबाचा त्रास उद्भवू शकतो. कामाच्या ठिकाणी पद किंवा पदावनती होण्याची भीती आहे. पती-पत्नीने एकत्र मिळून घेतलेल्या निर्णयामुळे व्यवसायात फायदा होईल. प्रेमातील तणावामुळे मानसिक त्रास वाढेल. शेजाऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागू शकतो. मुले समाजातील तुमचे नाव उज्ज्वल करतील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी वाढू शकते.
तुला - दुसऱ्यांना मदत केल्याने आज मनाला मोठा आनंद आणि शांती मिळेल. प्रेमाचा प्रस्ताव आज स्वीकारणे टाळलेलेच बरे. थकबाकी वसूल करताना अपमान सहन करावा लागू शकतो. शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. पत्नीशी झालेल्या वादामुळे मानसिक तणाव वाढेल. घरातील मोठ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभतील. शारीरिक त्रास वाढू शकतो. हस्तकलेच्या व्यवसायात असलेल्या लोकांसाठी दिवस खूप छान आहे. आज अशी काही अडचण येईल जी सोडवताना नाकी नऊ येतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने कामात प्रगती होईल.
वृश्चिक - मुलांशी संबंधित असलेली चिंता दूर होईल. घरात अवाजवी बोलणे टाळा, नाहीतर कलह होऊ शकतो. ऑफिसमध्ये शत्रू किंवा विरोधकांची संख्या वाढू शकते. संगीत साधनेसाठी आजचा दिवस योग्य आहे. आई-वडिलांशी वैचारिक मतभेद झाल्याने मानसिक तणाव वाढेल. कामात अडथळे येऊ शकतात. कोर्ट-कचेरीच्या कामांसाठी शुभ दिवस आहे. आगीशी संबंधित कामे करताना खूप काळजी घ्या. बऱ्याच दिवसांची प्रलंबित इच्छा आज पूर्ण होईल. व्यापारासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. साहित्य क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी वेळ अनुकूल आहे.
धनु - कोणतीही कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी लागेल. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कौटुंबिक तणाव वाढेल. तुमच्या गोड स्वभावाने तुम्ही सर्वांची मनं जिंकून घ्याल. गुप्त आजार असल्यास वेळेवर उपचार घ्या. घरी नातेवाईकांचे आगमन होईल. मालमत्तेच्या मुद्द्यावरून वडिलांशी वाद वाढू शकतात. लॉटरी किंवा जुगारात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. जुन्या शारीरिक वेदना पुन्हा डोके वर काढतील. व्यवसायात यश मिळाले तरी खर्चही मोठ्या प्रमाणावर होईल. उच्च शिक्षणात चांगली प्रगती कराल.
मकर - आज व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यापाऱ्यात मित्राची मोलाची साथ मिळेल. डोळ्यांच्या समस्येने त्रास होऊ शकतो. जास्त पैशांच्या लाभापोटी अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा वाढेल. रस्त्याने चालताना काळजी घ्या, अपघाताची शक्यता आहे. कोणत्याही वादात आज तुम्हाला विनाकारण दोषी ठरवले जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने काळ उत्तम असून चांगले परिणाम मिळतील.
कुंभ - काही शुभ किंवा मंगल कार्यासाठी दुसऱ्याची मदत करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षार्थींसाठी शुभ वेळ आहे. सहकाऱ्यांच्या मत्सर आणि असुयेमुळे ऑफिसमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. प्रवास करताना खूप सावधानता बाळगा. भावंडांकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. आर्थिक प्रगतीचे योग आहेत. आज गरजेपेक्षा जास्त बोलणे टाळा. दिवसभर मन चंचल राहील. कामाच्या निमित्ताने दूर जाण्याचे बेत अपयशी ठरू शकतात. वडिलांच्या आजारपणाची चिंता वाढू शकते. नवीन नोकरीची उत्तम संधी चालून येईल.
मीन - कौटुंबिक जीवनात शांतता आणि सुख कायम राहील. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घरी अचानक पाहुणे येऊ शकतात. मौजमजेच्या आणि कपड्यांच्या खरेदीवर खर्च वाढेल. एखाद्या कारणामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. आज आर्थिक नुकसानाचा योग असल्याने पैसे सांभाळून वापरा. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात फारसे लक्ष लागणार नाही आणि खर्च जास्त होईल. मुलांच्या भविष्याची चिंता वाढेल. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून चांगला सल्ला मिळेल.