Homemade Carrot Lip Balm : कोरड्या ओठ पुन्हा होतील गुलाबी, घरच्याघरी असा तयार करा गाजराचा लिप बाम

Published : Oct 31, 2025, 02:15 PM IST
Homemade Carrot Lip Balm

सार

Homemade Carrot Lip Balm : थंडीत बहुतांशजणांचे ओठ फाटतात किंवा कोरडे होतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच घरच्याघरी गाजराचा लिप बाम तयार करू शकता. जेणेकरुन फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल. 

DIY लिप बाम: थंडीची सुरुवात होताच कोरड्या त्वचेची समस्या जवळजवळ प्रत्येकालाच जाणवते. हात-पायांसोबतच सर्वात जास्त त्रासदायक ठरतात ते म्हणजे कोरडे ओठ (Dry Lips). बाजारात फाटलेल्या ओठांसाठी अनेक प्रकारचे लिप बाम उपलब्ध आहेत, पण त्यात केमिकल्स असल्याने त्यांचा परिणाम काही काळानंतर नाहीसा होतो. तुम्हीही महागड्या लिप थेरपी करून थकला असाल, तर यावेळी बीट-डाळिंबाऐवजी काहीतरी नैसर्गिक करून पाहा आणि घरीच गाजरापासून कॅरट लिप बाम (Carrot Lip Balm) बनवा.

घरी लिप बाम बनवण्याची पद्धत

DIY लिप बाममध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जात नाही. याचे कोणतेही दुष्परिणाम (Side Effects) होत नाहीत. तुम्हालाही नैसर्गिक रंगासोबत ओठांना उबदार ठेवायचे असेल, तर ही रेसिपी तुमच्या कामी येऊ शकते.

  • १ टेबलस्पून गाजराचा रस
  • अर्धा टेबलस्पून तूप
  • पोषणासाठी व्हिटॅमिन ई तेल

घरी लिप बाम कसा बनवायचा?

सर्वात आधी गाजर धुवून वाळवा आणि किसून घेतल्यानंतर त्याची पेस्ट बनवा. आता ते एका सुती कापडात टाकून त्याचा गर वेगळा करा आणि रस वेगळा काढा. हा रस मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. आता त्यात तूप घालून चांगले मिसळा. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही नारळाच्या तेलाचाही वापर करू शकता. यानंतर, लिप बाम एका लहान डबीत काढून ३०-४० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. झाला तुमचा होममेड लिप बाम तयार.

सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न

लिप बाम लावण्याचे फायदे

थंडीच्या दिवसात आर्द्रता आणि डिहायड्रेशनमुळे ओठ कोरडे होण्याची समस्या सामान्य आहे. अशावेळी लिप बाम लावण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते ओठांना पोषण देऊन त्यांना मुलायम बनवतात.

हिवाळ्यात ओठ का फाटतात?

थंडीतील कोरडी हवा आणि तापमानामुळे शरीरात अनेक बदल होतात. याचा परिणाम ओठांवर होतो आणि ते फाटतात. याशिवाय, व्हिटॅमिन-पोषक तत्वांसोबतच पाण्याची कमतरता हे देखील यामागील एक कारण आहे.

ओठ फाटल्यावर काय लावावे?

फाटलेल्या ओठांवर लिप बाम व्यतिरिक्त नारळ तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह ऑइल लावणे हा एक चांगला उपाय आहे. झोपण्यापूर्वी हे लावल्यास ओठांना नैसर्गिकरित्या पोषण मिळते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ray-Ban Meta Gen 2 स्मार्ट गॉगल भारतात लाँच, डोळ्यांनी करता येणार UPI पेमेंट
Health Care : पीरियड्सवेळी थकवा येतो? करा हे घरगुती उपाय