
Skin Care Tips : तणाव, झोप आणि वाढत्या वयाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर दिसून येतो. पण सर्वात जास्त जे दिसते ते म्हणजे डोळ्यांखालील सुरकुत्या. चेहऱ्याची चमक यामुळे कमी होते. बऱ्याचदा सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण महागडे क्रीम्स घेतो किंवा उपचारांवर भरपूर पैसे खर्च करतो. तरीही जास्त फायदा दिसत नाही. पण तुम्ही काही घरगुती उपाय करून सुरकुत्या नैसर्गिकरित्या कमी करू शकता. हे उपाय केवळ सुरकुत्या कमी करत नाहीत तर त्वचेला हायड्रेट आणि तरुणही ठेवतात.
एलोव्हेरा जेल डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो. ताजा जेल काढून डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर लावून ठेवा. हे त्वचेला हायड्रेट करते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. २५ वर्षांनंतर तर प्रत्येक महिलेने डोळ्यांखाली एलोव्हेरा जेल लावावा. सुरकुत्या येणारच नाहीत.
डोळ्यांवर थंड काकडीचे काप १०-१५ मिनिटांसाठी ठेवा. हे सूज कमी करते आणि त्वचेला आराम देते. सुरकुत्या हळूहळू कमी करते.
ग्रीन टी किंवा ब्लॅक टी ३-४ मिनिटे उकळा आणि नंतर फ्रीजमध्ये थंड करा. हे डोळ्यांखाली ठेवा. हे सूज आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
दूध आणि हळद एकत्र करून डोळ्यांखाली १५-२० मिनिटे लावा. दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला पोषण देते आणि हळद सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
डोळ्यांखाली काही थेंब नारळ किंवा बदाम तेल लावून मसाज करा आणि रात्रभर सोडा. यातील फॅटी अॅसिड्स नाजूक त्वचेला पोषण देतात आणि सुरकुत्या कमी करतात.
दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल काढून डोळ्यांखाली मसाज करा. हे काळे डाग आणि बारीक रेषा कमी करते आणि कोलेजन उत्पादन वाढवते.