
Mawa Modak Recipe in Marathi : संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने व उत्साहात साजरी केली जाते. गणेशोत्सवात भक्त आपल्या घरी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करतात आणि त्यांची विधिपूर्वक पूजा करतात. या खास दिवसात तुम्ही बाप्पांना माव्याच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करू शकता.
गणेशोत्सवात बाप्पांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. असे मानले जाते की गणपती बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्या पूजेमध्ये मोदकांचे विशेष महत्त्व आहे. विश्वास आहे की या दिवशी बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच तुम्ही या शुभ दिवशी बाप्पांना माव्याचे मोदक नक्कीच अर्पण करा.
मावा मोदक तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी
२ कप मावा
१ कप साखर
२ चमचे तूप
अर्धा चमचा वेलदोड्याची पूड
काजू (बारीक चिरलेले)
बदाम (बारीक चिरलेले)
पिस्ता (बारीक चिरलेले)
१. सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करा आणि त्यात मावा घालून मंद आचेवर परतून घ्या.
२. मावा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतत राहा आणि खमंग वास येऊ लागल्यावर गॅस बंद करा.
३. मावा थोडा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर आणि वेलदोड्याची पूड मिसळा.
4. नंतर त्यात चिरलेले काजू, बदाम, पिस्ता टाका आणि नीट मिसळा.
आजकाल स्टील, सिलिकॉन आणि प्लास्टिकचे मोदक साचे सहज मिळतात. तुम्ही कुठलाही साचा वापरू शकता.
१. साचा हलकासा तुपाने चोळून घ्या.
२. तयार मावा मिश्रण साच्यामध्ये हलक्या हाताने दाबून भरा.
३. साचा हळूच उघडा.
४. छानशा डिझाईनचे मावा मोदक तयार!
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना हे स्वादिष्ट आणि पारंपरिक मावा मोदक अर्पण करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा!