मार्च 2024 मध्ये होळी दहन आणि होळी हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. याचवेळी चंद्रग्रहण आले आहे. हे सण कधी साजरे केले जातील आणि चंद्रग्रहणाचा काय परिणाम होईल जाणून घेऊयात.
होळी दहन 2024 कधी?
धर्म ग्रंथांच्या माहितीनुसार होळी दहन हा कार्यक्रम फाल्गुन पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. यावेळी ही तिथी 24 मार्च रविवारी आली आहे. याचदिवशी होळीची पूजा करून दहन केले जाणार आहे.
होळी 2024 कधी?
होळी दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. यावेळी हा उत्सव सोमवारी 25 मार्च रोजी आहे. या दिवशी देशभरात विविध उत्सव आणि कार्यक्रम साजरे केले जातात.
चंद्रग्रहण 2024 हा कार्यक्रम कधी होणार?
वर्ष 2024 मधील पहिले चंद्रग्रहण सोमवार (25 मार्च) सकाळी 10.23 वाजता सुरु होऊन दुपारी 3.02 पर्यंत राहणार आहे. खास गोष्ट ही आहे की हे चंद्रग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही.
भारतात चंद्रग्रहणाचे सुतक पाळले जाईल का?
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार सोमवारी 25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून कुठूनही दिसणार नाही. त्यामुळे येथे या वेळी सुतक पाळले जाणार नाही.
आपल्या जीवनावर चंद्रग्रहणाचा परिणाम होईल का?
विद्वानांच्या म्हणण्यानुसार, चंद्रग्रहणाचा परिणाम सर्वांच्यावर होतो. ते कुठूनही दिसले नाही दिसले तरी त्याचा परिणाम हा होत असतो. ग्रहणाच्या शुभ अशुभ पासून कोणीही वाचू शकते. राशी यानुसारच फळ व्यक्तीला मिळत असते.