Indian Food : 1960च्या दशकात आपले आजोबा बाहेरून काय विकत आणून खायचे?

Published : Sep 22, 2026, 11:29 AM IST

आजकाल आपल्याला भूक लागली की दोन मिनिटांत मॅगी किंवा रेडी-टू-ईट फूड मिळतं. पण विचार करा, १९६० च्या दशकात परिस्थिती कशी असेल? त्या काळात आपले आजोबा बाहेरून कोणते पॅकेज्ड फूड विकत आणायचे आणि खायचे?

PREV
13
डालडा आणि पोल्सन बटरची क्रेझ

आजकाल आपल्याला इन्स्टंट नूडल्स आणि स्नॅक्स सहज मिळतात. पण १९६० च्या दशकात सुपरमार्केट नव्हते. तरीही शहरांमध्ये पॅकेज्ड फूडची एन्ट्री झाली होती. साजूक तूप महाग असल्यामुळे 'डालडा' (वनस्पती) प्रत्येक घराची गरज बनला. लोक तुपाऐवजी छोट्या-मोठ्या डब्यांत मिळणारा डालडा वापरू लागले. तसेच, अमूल ब्रँड हिट होण्यापूर्वी भारतीय घरांमध्ये 'पोल्सन बटर'ची प्रचंड क्रेझ होती. त्याकाळी बटर म्हणजे फक्त पोल्सन, एवढं ते लोकप्रिय होतं.

23
चहाची शान असलेले ग्लुकोज बिस्किट

पॅकेज्ड फूडमध्ये सर्वसामान्यांपर्यंत सर्वात आधी ग्लुकोज बिस्किट पोहोचले. पार्ले आणि ब्रिटानिया कंपन्यांनी अगदी कमी पैशात हे बिस्किट बाजारात आणले. १९६० मध्ये ब्रिटानियाचे 'ग्लुकोज डी' लाँच झाले आणि ते तुफान हिट ठरले. शाळेत जाणाऱ्या मुलांचा डबा असो, ट्रेनमधला प्रवास असो किंवा घरी आलेल्या पाहुण्यांचा चहा असो, ग्लुकोज बिस्किटचा पुडा हमखास असायचा. देशभरात या बिस्किटाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

33
अमूलची मिल्क पावडर आणि बेबी फूड

१९६० च्या दशकात भारतातील डेअरी प्रॉडक्ट्स क्षेत्रात एक मोठा बदल घडला. अमूलसारख्या सहकारी संस्थांनी म्हशीच्या दुधापासून मोठ्या प्रमाणावर बेबी मिल्क पावडर आणि चीज बनवायला सुरुवात केली. फूड इंडस्ट्रीमधली ही एक मोठी क्रांती होती. तोपर्यंत लोक फक्त घरचे ताजे दूध वापरायचे. पण इथून पुढे टिकणारी मिल्क पावडर आणि बेबी फूड वापरण्याकडे लोकांचा कल वाढला. आजच्या तरुणांना हे नॉर्मल वाटेल, पण १९६० मध्ये याच प्रॉडक्ट्सनी आधुनिक भारतीय खाद्यसंस्कृतीचा पाया रचला.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories