एअरटाइट कंटेनर - कणीक मळल्यानंतर ती उघडी ठेवू नका. हवा लागणार नाही अशा एअरटाइट डब्यात ती ठेवा. यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते आणि कणीक लवकर काळी पडत नाही.
क्लिंग फिल्म किंवा ॲल्युमिनियम फॉइल - तुमच्याकडे एअरटाइट डबा नसेल, तर एका भांड्यात कणीक ठेवून त्यावर ॲल्युमिनियम फॉइल घट्ट गुंडाळा. हे हवेपासून संरक्षण करतं.
तूप किंवा तेल लावा - कणीक मळल्यानंतर त्यावर थोडं तूप किंवा तेल लावा. यामुळे वरचा थर कोरडा पडत नाही आणि हवेचा संपर्क तुटल्याने कणीक मऊ व ताजी राहते.
झिपलॉक बॅग - कणकेला थोडं तेल लावून ती झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. बॅग सील करण्यापूर्वी आतली हवा पूर्णपणे बाहेर काढा आणि मगच ती फ्रिजमध्ये ठेवा.
गरजेपुरतीच कणीक मळा - तुम्हाला जेवढी गरज आहे, तेवढीच कणीक मळा. कमी प्रमाणात मळल्यास ती ताजी राहते, वाया जात नाही आणि साठवायलाही सोपी जाते.
या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर चपातीची कणीक काळी पडणार नाही आणि नेहमी मऊ व ताजी राहील.