मुंबई : पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन करणे टाळावे असे सांगितले जाते. बटाटे किंवा बीट दीर्घकाळ न वापरल्यास त्यांना मोड येऊ लागतात. मात्र बहुतांश महिला बटाट्यांना आलेले मोड काढून त्याची एखादी भाजी तयार करतात. पण खरंच, असे बटाटे किंवा बीट खावेत का?
पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. बटाटे किंवा बीटसारख्या मुळभाज्या जर नीट साठवले नाहीत, तर त्यांना लवकरच मोड येतात किंवा सडू लागतात. मोड आलेल्या भाज्या पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. अशा भाज्या खाणे सुरक्षित आहे का? काहीजण असा समज करून घेतात की मोड आलेले बटाटे किंवा बीट अधिक पोषक असतात, पण ही समजूत अर्धवट माहितीवर आधारित असू शकते.
25
मोड आलेल्या बटाट्यांमुळे नुकसान
बटाट्यांबाबत बोलायचे झाले, तर त्यामध्ये सोलानिन (Solanine) नावाचा विषारी घटक आढळतो जो विशेषतः बटाट्यांना मोड आल्यावर किंवा ते हिरवे पडल्यावर अधिक प्रमाणात तयार होतो. सोलानिन शरीरात गेल्यास अपचन, उलटी, डोकेदुखी, आणि कधी कधी विषबाधाही होऊ शकते. पावसाळ्यात बटाटे ओलसर ठिकाणी ठेवल्यास त्यांना लवकर मोड येतात, आणि अशा वेळी त्यांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागते. बटाट्यांच्या सालीवर हिरवे डाग दिसल्यास किंवा मोड आले असल्यास, अशा भागांना पूर्णपणे कापून टाकून वापरणे योग्य ठरेल. मात्र, खूपच मोड आलेले किंवा सडलेले बटाटे खाणे आरोग्यास घातक असते.
35
आरोग्यासंंबंधित समस्या
पावसाळ्यात मोड आलेले बटाटे खाणे टाळावे, कारण त्यातून सोलानिनसारखे विषारी घटक मिळू शकतात. बीटचे थोडेसे मोड येणे तितके घातक नसले तरी त्याच्या पोषणमूल्यांवर परिणाम होतो. त्यामुळे या भाज्या वापरण्याआधी त्यांची अवस्था बारकाईने पाहूनच निर्णय घ्यावा. ओल्या हवामानात अन्नसाठवणुकीकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहता येते.
बीटच्या बाबतीत थोडी वेगळी परिस्थिती आहे. बीटमध्ये सोलानिनसारखा घातक पदार्थ नसतो. मोड आलेले बीट तितकेसे घातक नसले तरी त्यांची पोषणमूल्ये कमी होतात आणि चवही बदलते. त्यामधील साखर आणि अँटीऑक्सिडंट्स मोडांच्या प्रक्रियेत कमी होतात.
55
खराब झालेले बीट खाणे टाळा
बीट जर थोडा मोडलेला आणि टवटवीत वाटत असेल, तर तो योग्यरीत्या धुवून आणि साले काढून वापरता येतो. मात्र, जर बीट मऊ पडलेला, वास येणारा किंवा सडण्याच्या अवस्थेत असेल, तर त्याचा वापर टाळावा.